Sanjay Dutt: 'आता साऊथ सिनेमातच काम करणार, बॉलीवूडने खरंतर...' संजय दत्त स्पष्टच बोलला Tollywood Movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Dutt Says he will love to do more south movies,bollywood should learn from them.

Sanjay Dutt: 'आता साऊथ सिनेमातच काम करणार, बॉलीवूडने खरंतर...' संजय दत्त स्पष्टच बोलला

Sanjay Dutt: संजय दत्त बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता. गेल्या अनेक वर्षांपासून तो इंडस्ट्रीत काम करतोय. त्याचं अख्खं घराणं बॉलीवूडशी जोडलेलं. त्यामुळे अर्थातच बॉलीवूडशी त्याचा जिव्हाळा असणार हे १०० टक्के. पण असं असताना अचानक अभिनेता म्हणू लागलाय, साऊथमध्येच त्याला आता काम करायचं आहे..अन् बॉलीवूडनं साऊथ सिनेमाकडनं बरंच शिकायला हवं..नेमकं काय बोललाय संजय दत्त, काय आहे त्याचा निर्णय? चला जाणून घेऊया.

संजय दत्त गेल्या काही दिवसांपासून साऊथ सिनेमांत काम करतोय. 'केजीएफ चॅप्टर 2' मधून कन्नड इंडस्ट्रीत पदार्पण केल्यानंतर आता संजय दत्त 'थलापति ६७' या सिनेमातून तामिळ इंडस्ट्रीत एन्ट्री करत आहे. तर संजय दत्तचा दुसरा कन्नड सिनेमा 'केडी द डेविल' रिलीजसाठी तयार आहे. आता काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं हिंदी टायटल रिलीज करण्यात आलं. (Sanjay Dutt Says he will love to do more south movies,bollywood should learn from them)

हेही वाचा: Janhvi Kapoor च्या चेहऱ्यावर होत्या मिश्या, म्हणाली,'ते दिवस माझ्यासाठी खूपच...'

या कार्यक्रमात संजय दत्तनं आता तो साऊथ सिनेमांतच काम करण्यास इच्छुक आहे असं स्पष्ट म्हटलं आहे. इतकंच नाही तर त्याने सांगितले की,''बॉलीवूडला खरंतर आता दाक्षिणात्य सिनेमांकडून बरंच काही शिकायची ही वेळ आहे. बॉलीवूड आपल्या मुळापासून दूर भरकटत चाललेलं आहे''.

हेही वाचा: Katrina Kaif: झोपण्याआधी कतरिना चुकूनही करत नाही 'ही' चूक, मनातल्या भीतीविषयी स्पष्टच बोलली...

संजय म्हणाला,''मी केजीएफ मध्ये आणि एसएस राजामौली यांच्यासोबत काम केलं आहे. मी पाहिलं की इथे सिनेमांप्रती खूप पॅशन आहे लोकांमध्ये, खूप प्रेमानं आणि उत्साहाने सिनेमे बनवले जातात. बॉलीवूडनं देखील हे सगळं विसरता कामा नये''.

हेही वाचा: Prajakta Mali: 'जेव्हा तुमच्या क्रशसोबत तुमचं लग्न होतं..', प्राजक्ताच्या पोस्टनं वेधलं लक्ष

संजयच्या हिंदी सिनेमांविषयी बोलायचं झालं तर संजय दत्त याआधी रणबीर कपूरसोबत 'शमशेरा' सिनेमात दिसला होता. सिनेमा बॉक्सऑफिसवर मात्र दणकून आपटला. त्याआधी 'पृथ्वीराज' सिनेमातही संजय दत्त होता. पण तो सिनेमाही फ्लॉप झाला . आता संजय दत्त 'घुडचढी' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत रविना टंडन,पार्थ समंथान आणि खुशाली कुमार मुख्य व्यक्तिरेखा साकारताना दिसतील.