संजूबाबा म्हणे, ज्या दिवशी ठरले तेव्हाच KGF 2 होणार प्रदर्शित

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 17 October 2020

अलिकडेच K.G.F Chapter 2 चं नवं पोस्टर देखील प्रदर्शित झालं होतं. या पोस्टरमधून संजय दत्तचा खलनायक लूक समोर आला होता. आता दस्तुरखुद्द संजूबाबानेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल माहिती दिली आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेयर केली आहे.

मुंबई - केजीएफचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना दुस-या भागाचे वेध लागले होते. खरं तर पहिल्या भागाला प्रचंड यश मिळाल्यापासून मागील वर्षापासून प्रेक्षक त्याच्या दुस-या भागाची वाट पाहत आहे. या भागात बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता संजय दत्त हा काम करणार असल्याने सर्वांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले आहे. मात्र त्यातच संजूबाबाला कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला.

दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा K.G.F Chapter 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. अलिकडेच K.G.F Chapter 2 चं नवं पोस्टर देखील प्रदर्शित झालं होतं. या पोस्टरमधून संजय दत्तचा खलनायक लूक समोर आला होता. आता दस्तुरखुद्द संजूबाबानेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल माहिती दिली आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेयर केली आहे. बाबाच्या उपचारासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन प्रदर्शनासाठी वेळ लागणार असल्याची चर्चा होती. यामुळे त्याचे प्रदर्शन लांबणार असल्याची भीती प्रेक्षकांना होती. यासगळ्यात संचय दत्तने चाहत्यांना दिलासा दिला आहे. त्यात त्याने एन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करुन K.G.F ची तयारी सुरु केल्याचे सांगितले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Gearing up for #Adheera! #KGFChapter2

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay) on

 

सध्या संजय दत्तवर उपचार सुरु आहेत. मात्र या उपचारांमुळे KGF चं चित्रीकरण उशिरा होणार नाही असे त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.  यापूर्वी  चित्रपटाचे निर्माते कार्तिक गौंडा यांनीही असे सांगितले होता. “चित्रपटाचं शूटिंग जवळपास पूर्ण झालं आहे. संजय दत्तचे केवळ तीन सीन बाकी आहे. शिवाय आम्ही तीन महिन्यानंतर चित्रीकरण सुरु करणार आहोत. तो पर्यंत संजय पूर्णपणे बरा होईल अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी काळजी करु नये. K.G.F Chapter 2 ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होईल.”  असे ते म्हणाले होते.

 

संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. त्याला चौथ्या टप्प्यातील कर्करोग झाल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.  लिवूड अभिनेता संजय दत्त केजीएफ 2  या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो अधीरा हे पात्र साकारणार आहे. हा चित्रपटही पहिल्या भागाप्रमाणेच हिंदी, तामिळ आणि कन्नड या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.काही महिन्यांपूर्वी संजय दत्तने या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन याबाबत माहिती दिली होती.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Dutt share post about Kgf 2