अडचणीत सापडलेल्या मुंबईच्या डब्बेवाल्यांसाठी संजय दत्तकडून मदतीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

डब्बेवाले कित्येक दशकांपासून मुंबईकरांना जेवण पुरवत आहेत.

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन लागू केल्याने सर्वसामान्य कामगारांचे हाल होताना दिसत आहेत, सगळे उद्योग बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. लॉकडाऊन काळात मुंबईच्या डब्बेवाल्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बॉलिवुड चित्रपट अभिनेता संजय दत्तने मुंबईची भूक भागवणाऱ्या या डब्बेवाल्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. 

व्यायमात मिलींद सोमणला पत्नी अंकिताची अनोखी साथ...पाहा फोटो..

गरजू लोकांच्या मदतीसाठी सर्व स्तरातील लोक पुढे येत आहेत. दरम्यान संजय दत्तने महाराष्ट्राचे मंत्री अस्लम शेख यांच्या ट्विटला रिप्लाय करत नागरीकांनी डब्बेवाल्यांसाठी शक्य तेवढी मदत करण्याची विनंती केली आहे. सरकारकडून मदत संजय दत्तचे मदतीचे अवाहन करणारे हे ट्विट सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहे. 

 

 

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईची लोकल ही जीवनरेखा आहे तर ऑफिसमध्ये जेवणाचे डब्बे पोहचवणारे डब्बेवले हे मुंबईची दूसरी जीवनरेखा असल्याचे सांगत, शंभरपेक्षा जास्त वर्षांपासून दररोज अखंडीत सेवा देत कामगारांना घरचे जेवण पुरवणाऱ्या डब्बेवाल्यांसोबत संकटकाळात सरकार खंबीर उभे राहील असे ट्विट केले होते. त्या ट्विटला रिट्विट करत संजय दत्तने “डब्बेवाले कित्येक दशकांपासून मुंबईकरांना जेवण पुरवत आहेत, आता वेळ अशी आहे की आपल्या सगळ्यांनी पुढे येत त्यांची मदत केली पाहिजे.” असे ट्विट केले आहे. संजय दत्तने त्याच्या ट्विटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कार्यालय, मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेता सुनिल शेट्टी यांना टॅग केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay dutt urges people to help Mumbai dabbawalas in crisis