परदेशात उपचाराला जाण्यापूर्वी संजय दत्त सडक २ चे डबिंग करणार; अन्य प्रोजेक्टबाबत प्रश्नचिन्ह

दिलीप यादव
Sunday, 16 August 2020

संजय दत्त परदेशात उपचाराला जाण्यापुर्वी सडक २ या चित्रपटाचे डबिंग करणार आहे. मात्र अन्य प्रोजेक्टबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

मुंबई ः अभिनेता संजय दत्तला कर्करोग झाल्याचे समजताच हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच संजय दत्तच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. संजय दत्त या आजारातून लवकरात लवकर बाहेर यावा अशी प्रार्थना त्याचे चाहते करीत आहेत. संजय दत्त उपचारासाठी अमेरिकेत जाणार आहे. मात्र जाण्यापू्र्वी तो महेश भट दिग्दर्शित सडक २ या चित्रपटाचे डबिंग करणार आहे. मात्र अन्य प्रोजेक्टबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Exclusive Interview : परिक्षक म्हणून प्रशांत दामले यांची नवी इनिंग; त्यांच्याशी साधलेला खास संवाद -

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार संजय दत्त  सडक 2 चे डबिंग  पूर्ण करणार आहे. याशिवाय अन्य प्रोजेक्टसबद्दल काही समजलेले नाही. “ सडक 2 ” पाठोपाठ संजयचा “ भूज “ हा चित्रपट ही प्रदर्शित होणार होता व त्याचेही चित्रीकरण सुरूच होते . “ केजीएफ 2 ” हाही एक मोठा चित्रपट आहे. रणबीर कपूरच्या “ शमशेरा ” मध्येही संजय काम करीत आहे . मध्यंतरी काही बड्या निर्मात्यांसमवेत संजय दत्तने वेब सिरीजसाठी काही प्रोजेक्ट्स साईन केल्याचे समजले होते . आशुतोष गोवारीकर यांच्या “ पानिपत ” नंतर संजय दत्त पुन्हा बॉलीवूडमध्ये सक्रीय झाला होता व त्याने विविध निर्माते-दिग्दर्शकांसमवेत बैठका घेतल्या होत्या, असे समजते.

पनाह! भारतातील घरगुती हिंसाचाराविरुद्ध आवाज उठवणारा लघुपट 

अमेरिकेला उपचारासाठी जाणाऱ्या संजय दत्त सोबत बहीण नम्रता व मेव्हणा कुमार गौरव जातील, असेही बोलले जात आहे,  तर अमेरिकेतच राहात असलेली संजय दत्तची मुलगी त्रिशालाकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्रिशाला सोशल साईटवर नेहेमीच सक्रीय असते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Dutt will be dubbing Road 2 before going abroad for treatment; Question marks about other projects