संजय दत्तचे चाहते करताहेत प्रार्थना; टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी बाबासाठी अखंड ज्योत तेवत ठेवणार

संतोष भिंगार्डे
Thursday, 13 August 2020

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची बातमी आल्यानंतर त्याचे चाहते तसेच अनेक सेलिब्रिटी सातत्याने सोशल मीडियावर संजय दत्त लवकरात लवकर या आजारातून मुक्त व्हावा याकरिता प्रार्थना करत आहेत.  

मुंबई ः  बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची बातमी आल्यानंतर त्याचे चाहते तसेच अनेक सेलिब्रिटी सातत्याने सोशल मीडियावर संजय दत्त लवकरात लवकर या आजारातून मुक्त व्हावा याकरिता प्रार्थना करत आहेत.  दरम्यान, टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी हिनेही संजय दत्तला लवकरात लवकर बरे वाटण्यासाठी प्रार्थना केली आहे.

काम्या संजयसाठी सतत ट्वीट करत असते आणि त्याने लवकर बरे होण्यासाठी काम्याने नुकतेच एक ट्विट केले. ज्यात तिने लिहिले की, 'मी बाप्पाला प्रार्थना करीन, यंदाची गणेश स्थापना बाबाच्या प्रार्थनांनी भरून जाईल.  बाबांसाठी मी अखंड ज्योत तेवत ठेवणार आहे.

गँग्स ऑफ फिल्मीस्तान: सुनील ग्रोवर यावेळी डॉक्टर नाही तर गँगस्टर बनून हसवण्यासाठी सज्ज

त्यानंतर काम्या हिने आणखी एक ट्विट केले आहे ज्यात संजय, सुनील आणि नर्गीस यांचा फोटो आहे. हा फोटो शेअर करताना काम्याने असे लिहिले होते की, कर हर मैदान फतेह गणपती बाप्पा तुम्हाला ही लढाई जिंकण्यासाठी शक्ती देवो आणि ही लढाई तुम्ही जिंकून येवो. तुम्हीसुद्धा प्रार्थना करत रहा, प्रार्थनेमध्ये बरीच शक्ती असते. 

त्याशिवाय ती म्हणाली, कृपया खंबीर रहा आणि लवकर बरे व्हा.  मी दहा वर्षाची असल्यापासून तुमची फॅन आहे. तुम्हाला आठवतंय की मी तुम्हाला मेहबूब स्टुडिओमध्ये भेटले होते आणि तेव्हा तुम्हाला झिपो भेट म्हणून दिली होती. मी तीच मुलगी आहे आणि मी प्रार्थना करीत आहे.संजय दत्त यांना कर्करोग असल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले. ते पुढील उपचारांसाठी लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Dutts fans are praying; TV actress Kamya will keep the flame burning for Punjabi Baba