भन्साळींच्या चौकशीत खुलासा, सुशांतनेच 'या' कारणामुळे नाकारले होते भन्साळींचे ४ सिनेमे

bhansali on sushant
bhansali on sushant

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची पोलीस सतत चौकशी करत आहेत. या प्रकरणात सुशांतसोबत भेदभाव झाल्याच्या आरोपांनंतर आता पोलिसांनी वेगळ्या दिशेने तपास सुरु केला आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात ३० जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. सोमवारी प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना चौकशीसाठी बांद्रा पोलीस स्टेशनला बोलवलं गेलं होतं. भन्साळींची ही चौकशी जवळपास ३  तास चालली. या चौकशीतून काही महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत.

सुशांतच्या आत्महत्येनंतर तो नैराश्यवर उपचार घेत होता अशा चर्चा ऐकायला मिळाल्या. त्यामुळे त्याच्या नैराश्याचं कारण शोधण्यासाठी पोलीस आता कसून तपास करत आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच नाव समोर आलं त्यामुळे पोलिसांनी त्यांना याबाबत चौकशीसाठी बोलावलं होतं. भन्साळींसोबत केलेल्या चौकशीमध्ये हे समोर आलं आहे की भन्साळी यांनी सुशांतला एक नाही तर चार सिनेमांच्या ऑफर दिल्या होत्या. यामध्ये 'गोलिंयो की रासलील रामलीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' यांसारख्या सिनेमांचा समावेश होता.

भन्साळी बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये जवळपास ३ तास त्यांच्या वकिलांसोबत हजर होते.मिळालेल्या माहितीनुसार, भन्साळी यांनी पोलिसांसमोर या गोष्टीचा खुलासा केला की त्याला ४ सिनेमांच्या ऑफर केल्या गेल्या होत्या मात्र त्याच्याकडे तारखा उपलब्ध नव्हत्या. अर्थात मला दिग्दर्शक म्हणून माझ्या सिनेमासाठी झोकून काम करणारा आणि भूमिकेला पूर्ण वेळ देणारा अभिनेता हवा होता. सुशांतचा तेव्हा दुस-या प्रोडक्शन हाऊससोबत करार असल्याने त्याने या सिनेमांना नकार दिला. त्याने स्वतः तीन सिनेमांमधून काढता पाय घेतला होता. इतकंच नाही तर असं असूनही भन्साळी यांनी त्याच्या चौथ्या सिनेमाची देखील ऑफर दिली होती मात्र त्याचंही पुढे काही झालं नाही. 

भन्साळी यांनी 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' या बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरलेल्या सिनेमांसाठी सर्वात आधी मुख्य भूमिकेसाठी सुशांतलाच फायनल केलं होतं. मात्र सुशांतकडे तारखा उपलब्ध नसल्याने त्याने या सिनेमांना नकार दिला. यावेळी तो शेखर कपूर यांच्या 'पानी' या सिनेमासाठी काम करत होता. इतकंच नाही तर 'पानी' सिनेमासाठी त्याने जीव तोडून मेहनत केली होती. मात्र हा सिनेमा प्रदर्शित झालाच नाही. सुशांतसा देखील या सिनेमांमुळे भन्साळींसोबत काम करण्याची संधी हुकल्याचं दुःख होतं. 

२०१५ सालापर्यंत सुशांत यशराज फिल्मसोबत करारमध्ये होता. यामध्ये त्याने २०१३ साली 'शुद्ध देसी रोमान्स' आणि २०१५ साली 'डिटेक्टिव्ह बक्क्षी' हे सिनेमे केले. सुशांतचा या प्रोडक्शनसोबत आणखी तीन सिनेमांचा करार होता. शेखर कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'पानी' सिनेमात देखील त्याचा समावेश करण्यात आला होता मात्र हा सिनेमा नंतर बंद पडला.     

sanjay leela bhansali offerd 4 films to sushant singh rajput but he refused  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com