Video: शिवसेनेचे खासदार राऊतांना अमिषा पटेलची 'झप्पी!'|Sanjay Raut Shivsena Leader Bollywood Actress Amisha Patel | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut Shivsena Leader Bollywood Actress Amisha Patel

Video: शिवसेनेचे खासदार राऊतांना अमिषा पटेलची 'झप्पी!'

Tv Entertainment News: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यांच्या परखड स्वभावाबद्दल आणि वक्तव्याविषयी ओळखले जातात. सध्या राज्यातील राजकारणामध्ये (Bollywood News) महत्वाची भूमिका राऊत पार पाडताना दिसत आहे. सातत्यानं विरोधी (Maharastra News) पक्षांच्या आरोपांना सणसणीत उत्तर देऊन आपला करारी बाणा दाखवून दिला आहे. राऊत हे नेहमीच चर्चेत असणारं व्यक्तिमत्व आहे. ते आता सोशल मीडियावर एका (Amisha Patel) व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये त्यांना बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेलनं झप्पी दिली आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहे. यापूर्वी देखील राऊत यांच्या व्हिडिओंनी नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले होते. खासकरुन राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांवर व्यक्त केलेला राग हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला होता.

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट येत्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच्या ट्रेलर लॉचिंगचा कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडला. यावेळी बॉलीवूडमधील मोठमोठे सेलिब्रेटी उपस्थित होते. बॉलीवूडचा भाईजान सलमान खान, प्रख्यात अभिनेता रितेश देशमुखनं या सोहळ्याला हजेरी लावली होती. मात्र लक्ष वेधून घेतलं ते राऊत यांच्या व्हिडिओनं. यावेळी अमिषा पटेलनं राऊत यांची घेतलेली गळाभेट नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय ठरला आहे. त्यावर त्यांनी भन्नाट कमेंटसही दिल्या आहेत. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकची निर्मिती प्रवीण तरडे यांनी केली असून त्यामध्ये आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओकनं साकारली आहे. त्याच्या लूकला प्रचंड प्रतिसादही मिळाला आहे.

हेही वाचा: Ajit Pawar, Sanjay Raut Reactions on Raj : अल्टिमेटमवर ठाकरे-राऊत-पवार काय म्हणालेत?

मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे हे व्यक्तिमत्व काय होते, त्यांचा दरारा, त्यांचे सार्वजनिक जीवनातील काम, शिवसेना आणि लोकांप्रती असलेली निष्ठा समजून घ्यायची असल्यास हा चित्रपट प्रत्येकानं पाहावा. अशी प्रेमळ विनंती प्रेक्षकांना केली आहे. 13 मे रोजी महाराष्ट्रभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

Web Title: Sanjay Raut Shivsena Leader Bollywood Actress Amisha Patel Trailer Launching Video Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top