'संजू'चा ट्रेलर लॉन्च

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

रणबीर कपूरने आपल्या अभिनयातून संजय दत्तचे हावभाव हुबेहुब दाखविले आहे. तारुण्यातील संजय दत्त ते 58 वर्षाच्या प्रवासाला आपल्या दमदार अभिनयातून मांडले आहे.

अभिनेता रणबीर कपूर स्टारर 'संजू' या सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च झाला आहे. अभिनेता संजय दत्त याची बायोपिक असलेला 'संजू' सिनेमा ट्रेलरच्या आधीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमाचा टीजर लॉन्च झाल्यानंतर दर्शक ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. 

हा ट्रेलर पाच शहरांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात संजू बाबाच्या आयुष्यातील भरपूर मसालेदार किस्स्यांची झलक दाखवली आहे. ड्रग्स घेण्याचे व्यसन ते तीनशे पेक्षा जास्त महिलांसोबत आलेले संबंध, 1193 च्या बॉम्ब ब्लास्ट घटनेच्या दरम्यान शस्त्रास्त्र बाळगल्याच्या आरोपानंतर तुरंगात झालेली रवानगी, तुरुंगात व्यथित केलेले आयुष्य, सिनेसृष्टीत फ्लॉप सिनेमांनंतर पुन्हा दमदार वापसी या सर्वांची झलक आपल्याला ट्रेलरमध्ये बघायला मिळते.  

रणबीर कपूरने आपल्या अभिनयातून संजय दत्तचे हावभाव हुबेहुब दाखविले आहे. तारुण्यातील संजय दत्त ते 58 वर्षाच्या प्रवासाला आपल्या दमदार अभिनयातून मांडले आहे. रणबीर शिवाय या सिनेमात परेश रावल सुनील दत्त यांच्या आणि मनिषा कोईराला नरगिस दत्त यांच्या भूमिकेत दिसतील. विक्की कौशल, दिया मिर्जा, सोनम कपूर, अनुष्का शर्मा हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Sanju movie trailer out