Sankarshan Karhade: गणपती मला स्वत: घ्यायला येईल! आणि संकर्षनला आली दैवी प्रचिती.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sankarshan Karhade shared post about devotional experience of ganpati pule

Sankarshan Karhade: गणपती मला स्वत: घ्यायला येईल! आणि संकर्षनला आली दैवी प्रचिती..

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade) हे नाव आता अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक झालं आहे. 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या मालिकेतून त्याने झी मराठी च्या मंचावर पाऊल ठेवलं आणि उत्तरोत्तर प्रगती केली. अभिनयासोबतच कविता, नाट्यलेखन अशी त्याची मुशाफिरी सुरूच आहे. झी मराठी (zee marathi) वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (majhi tujhi reshimgath) या मालिकेतील त्याची भूमिका चांगलीच लोकप्रिय आहे. संकर्षन सोशल मिडियावर चांगलाच सक्रिय असतो. आज त्याने त्याला आलेल्या दैवी अनुभवाविषयी लिहिले आहे.

(Sankarshan Karhade shared post about devotional divine experience of ganpati pule)

हेही वाचा: Sai Tamhankar: कंदील, लंगोट, झालर, उर्फी.. त्या फोटोने सई होतेय तुफान ट्रोल..

संकर्षन प्रयोगासाठी कोकणात गेला होता. यावेळी त्याला गणपतीपुळ्याच्या बाप्पाचे दर्शन घ्यायची इच्छा झाली. परंतु वेळेअभावी ते शक्य नव्हते. पण बाप्पा त्याला दर्शन देईल असा विश्वास त्याला वाटत होता आणि अखेर ते खरेच झाले. यावेळी घडलेला प्रसंग पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. हा सगळा अनुभव त्याने आपल्या पोस्ट मधून शेयर केला आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: राडा घालणाऱ्या कलाकारांचे बिग बॉसच्या घरातील हे गोड फोटो पाहिले का?

संकर्षन म्हणतो, 'मी परवा मुंबईहुन नाटकाच्या कोकण दौऱ्यासाठी निघतांना घरात सहज म्हणालो कि , रत्नागीरीहून २.३० तासावर गणपतीपुळे आहे.. दर्शनाला जाउन येइन. तेंव्हा बाबा काळजीने म्हणाले कि , का धावपळ करतोस..? वेळ मिळालाय तर दिवसभर आराम कर.. त्यात तू जाणार कसा ..? प्रवासाचं काय नियोजन ..? हे विचारल्यावर मी अगदी सहज थाटात म्हणालो कि , “बाबा काळजी करु नका.. मला गणपती स्वत: घ्यायला येईल ..” आणि घरुन निघालो…..

''काल रात्री रत्नागीरीच्या प्रयोगाला गणपतीपुळे देवस्थान चे पुजारी श्री. उमेश घनवटकर प्रसादाचे उकडीचे मोदक घेउन आले.. मला म्हणाले चला दर्शनाला गाडी घेउनच आलोय.. मी म्हणालो पण माझं काही तशी तयारी नाहीये.. शिवाय आमची राहायची सोय चिपळून ला आहे .. तेंव्हा ते म्हणाले रहायची , दर्शनाची , जेवणाची सगळी सोय , नियोजन मी करतो.. तुम्ही फक्तं गाडीत बसा आणि चला .. मला माझंच स्वत:चं वाक्यं आठवलं “बाबा काळजी करु नका.. मला गणपती स्वत: घ्यायला येईल ..”

''मी रत्नागीरीच्या प्रयोगानंतर त्यांच्या गाडीत बसलो तर अर्थातच समोर गणरायाचा छानसा फोटो.. काल मध्यरात्री सुखरूप इथे पोचलो .. राहाण्याची उत्तम सोय त्यांनीच कोली.. आज सकाळी त्यांनीच मला सोवळं दिलं .. दर्शनाला घेउन गेले .. माझ्या हातून बाप्पाचा अभिषेक केला.. आणि मनसोक्तं खायला घातलं ..''

शेवटी त्याने लिहिलं आहे की, ''मी तुम्हाला कसा सांगु ह्या प्रत्येक क्षणांत मला असं वाटत होतं कि हे सगळं गणपती मी उच्चारलेल्या त्या एका वाक्यासाठी माझ्याकडून करवून घेतोय.. माझी आई मला माझ्या लहानपणापासून सांगत आलीये कि , “बोलतांना कायम चांगलं बोलावं .. “ मी उच्चारलेल्या त्या एका चांगल्या वाक्यासाठी गणपती बाप्पा ने माझ्यासाठी काय काय केलं .. मी खूप भाराऊन गेलोय.. बाप्पा मोरया ..'' असा अनुभव संकर्षनने सांगितला आहे. त्याच्या या पोस्टवर कलाकारांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.