Santosh Juvekar:थोडक्यात वाचला संतोष! म्हणाला, माझ्या डाव्या बाजूने र्रपाक्कन बसली असती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Santosh Juvekar shared post about director samit kakkad and 36 gunn movie

Santosh Juvekar:थोडक्यात वाचला संतोष, म्हणाला! माझ्या डाव्या बाजूने र्रपाक्कन बसली असती

santosh juvekar : झेंडा, मोरया, एक तारा आणि यासारखे कितीतरी चित्रपट गाजवलेला एक उत्तम अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. तो सोशल मिडियावरही बराच सक्रिय असतो. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. संतोष अभिनया सोबत सामाजिक कामातही बराच सक्रिय असतो. लवकरच त्याचा '36 गुण' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो आणि पूर्वा पवार प्रमुख भूमिकेत आहेत. अत्यंत वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन समित कक्कड याने केले आहे. याच चित्रपटातील एक फोटो शेयर करून संतोषने एक पोस्ट लिहिली आहे. (Santosh Juvekar shared post about director samit kakkad and 36 gunn movie)

संतोष या पोस्टमध्ये चित्रपटातील चित्रीकरणाचा अनुभव सांगितला आहे. तो म्हणतो, 'हा आहे आमचा दिग्दर्शक समित कक्कड (Samit Kakkad). तो मित्र परिवारात आणि चित्रपट सृष्टीत सॅम, काके, कक्के, ह्या टोपण नावानेही ओळला जातो ह्याने आत्तापर्यंत मराठी हुप्पाहूय्या, आयनाका बायना, half ticket आणि असे उत्तम आणि superhit सिनेमे बनवले आहेत आणि आता त्याच्या सोबत आम्ही सगळे एक अजून नवा चित्रपट घेऊन येतोय "३६गुण" ह्या येत्या ४ नोव्हेंबरला.'

पुढे तो (santosh juvekar ) म्हणतो, 'तो त्याच्या कामावर किती फोकस करतो, आणि त्याच्या सिनेमात, शूटिंग करताना प्रत्येक सिन मधे किती घुसलेला असतो हे तुम्हाला ह्या फोटोवरून लक्षात येईलच. मला तर असं वाटतंय हा फोटो बघून की जरका मी जराजरी कुठे चुकलो असतो तर माझ्या डाव्या बाजूने र्रर्रर्रर्रर्रर्रर्रपाक्कन!!!!!! आवाज आला असता.. असो........ तुम्ही ४ नोव्हेंबर पासून थिएटरला जाऊन ३६ गुण पहा..' असे संतोषने या पोस्ट मध्ये लिहिले आहे.

टॅग्स :Marathi Movies