Santosh Juvekar: मुलाचा '36 गुण' चित्रपट पाहून संतोष जुवेकरचे वडील काय म्हणाले, बघाच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Santosh Juvekar shared post about his father reaction after watching his movie 36 gunn

Santosh Juvekar: मुलाचा '36 गुण' चित्रपट पाहून संतोष जुवेकरचे वडील काय म्हणाले, बघाच..

santosh juvekar: झेंडा, मोरया, एक तारा आणि यासारखे कितीतरी चित्रपट गाजवलेला एक उत्तम अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. तो सोशल मिडियावरही बराच सक्रिय असतो. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. संतोष अभिनया सोबत सामाजिक कामातही बराच सक्रिय असतो. त्याचा '36 गुण' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यावेळी तो आपल्या वडिलांना घेऊन चित्रपट पाहायला गेला होता. त्यानंतर त्याने बाबांच्या प्रतिक्रियेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

(Santosh Juvekar shared post about his father reaction after watching his movie 36 gunn)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: मनातलं प्रेम अखेर ओठावर! प्रसादनं केलं अमृताला प्रपोज..

संतोषचा '३६ गुण' हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. '३६ गुण जुळूनही संसारात अडचणी येतातच यावर भाष्य करणार असा दमदार आणि तरुणांना आवडणारा चित्रपट आहे. या चित्रपटात संतोष आणि पूर्वा पवार प्रमुख भूमिकेत आहेत. अत्यंत वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन समित कक्कड याने केले आहे. याच चित्रपटाबाबत संतोषच्या बाबांची काय मत मांडलंय हे एका व्हिडिओच्या माध्यमातून संतोषने शेयर केले आहे सोबत एक पोस्ट पण लिहिली आहे.

हेही वाचा: Malaika Arora: बाई, नवीन कपडे घे आता.. जम्पसूट वरुन मलायका झाली ट्रोल!

या पोस्ट मध्ये संतोष म्हणतो, 'माझ्या बाबांनी झेंडा मोरया आणि एक तारा हे माझे चित्रपट माझ्यासोबत थेटर मध्ये पाहिले. आणि आज माझा छत्तीस गुण हा सिनेमा माझ्यासोबत त्यांनी थेटर मध्ये पाहिला जवळजवळ सात आठ वर्षांनी. 36 गुण हा सिनेमा बघून त्यांना काय वाटलं हे त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलय..'

या व्हिडिओत संतोषचे बाबा म्हणतात, 'हल्लीची मुलं ऑनलाइन माध्यमातून आपलं लग्न जमवतात. तर काहीजण पत्रिका पाहून.. पण मनं जुळणं महत्वाचं आहे, एकमेकांवर विश्वास हवा. विश्वासावर जग चाललंय. त्यामुळे आपल्या जीवनसाथीवर तो हवाच. शिवाय जोवर तुमचे विचार जुळत नाही तोवर पत्रिका जुळूनही काही उपयोग नाही.' अशी प्रतिक्रिया संतोषच्या बाबांनी '३६ गुण'चित्रपटाविषयी दिली. संतोषने शेयर केलेला हा चित्रपट चांगलाच पसंतीस उतरला आहे.