Sara Ali Khan:'हिचा अभिनय म्हणजे..', 'ए वतन मेरे वतन' चा टीझर पाहून सारावर ट्रोलर्सनी साधला निशाणा Ae watan mere watan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sara Ali Khan

Sara Ali Khan:'हिचा अभिनय म्हणजे..', 'ए वतन मेरे वतन' चा टीझर पाहून सारावर ट्रोलर्सनी साधला निशाणा

Sara Ali Khan: सारा अली खानचा सिनेमा 'ए वतन मेरे वतन' चा फर्स्ट लूक सोमवारी २३ जानेवारी रोजी रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात सारा एकदम नव्या लूकमध्ये दिसत आहे. प्राइम व्हिडीओच्या या सिनेमात सारा एका स्वांतत्र्यसेनानीच्या भूमिकत दिसणार आहे.

दावा केला जात आहे की, सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे. सर्वात इंट्रेस्टिंग गोष्ट ही आहे की या सिनेमात साराला पाहून लोकांना 'राझी' सिनेमातील आलिया भट्ट आठवायला लागली आहे. सोशल मीडियावर व्हायल झालेल्या 'ए वतन मेरे वतन'च्या व्हिडीओवर लोक आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

अनेकांना साराचा अभिनय आवडलेला दिसत नाही, निदान लोकांच्या कमेंट्स वाचून तरी तसंच काहीसं वाटत आहे.(Sara Ali Khan Ae Vatan Mere Vatan Teaser Out, actress trolled)

हेही वाचा: The Lost Prime Minister:सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य समोर आणते ही सीरिज.. सत्य घटना हैराण करतील..

'ए वतन मेरे वतन' सिनेमाच्या टीझरमध्ये सारा रेट्रो लूकमध्ये दिसली. तिनं पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली आहे. ती कोणत्यातरी सीक्रेट मिशनवर असल्याचं दिसत आहे. ती अगदी गुपचूप एक मेसेज ब्रॉडकास्ट करताना दिसते...म्हणते,''इंग्रजांना वाटत आहे त्यांनी क्वीट इंडियाला संपवून टाकलं. पण स्वातंत्र्यासाठी लढणारे आवाज असे कैद करुन ठेवता येत नाहीत. हा हिंदुस्थानचा आवाज आहे,हिंदुस्थानमधनं कुठूनतरी ...'', आणि अचानक ती घाबरून मागे पाहते...

हेही वाचा: रिअल लाईफमध्ये प्रमाणापेक्षा जास्तच शिकलाय जेठालाल..

सिनेमाचा व्हिडीओ सारा अली खाननं देखील शेअर केला आहे. तिनं व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की,''भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीरांना माझी विनम्रपूर्ण श्रद्धांजली''. साराच्या या पोस्टवर एका नेटकऱ्यानं लगेचच सारा सिनेमात कोणाचं पात्र रंगवतेय याचा अंदाज लावला आहे.

साऱ्याच्या एका फॉलोअरनं लिहिलं आहे की,''ही कदाचित श्री ऊषा मेहता यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. त्यांना सीक्रेट कॉंग्रेस रेडियो साठी ओळखलं जात होतं. हे अंडरग्राऊंड रेडिओ स्टेशन भारत छोडो आंदोलना दरम्यान सुरू होतं. खूप चांगला विषय आहे''. जिथे लोक एकीकडे सिनेमाच्या विषयाची प्रशंसा करताना दिसत आहेत,तिथे दुसरीकडे काही लोक साराला तिच्या अभिनयावरनं नावं ठेवताना दिसत आहेत.

विरल भयानीनं इन्स्टाग्रामवर 'ए वतन मेरे वतन' सिनेमाच्या टीझरचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर एका नेटकऱ्यानं लिहिल आहे,'साराचा लूक पाहून आलियाची आठवण आली. नाइस लूक...काहीतरी नवीन आहे'. तर एकनं साराला ट्रोल करत लिहिलं आहे, 'सारा नेपोटिझमचं परफेक्ट उदाहरण आहे. जान्हवी नेपोटिझची दुसरी केस आहे'. आणखी एकानं कमेंट करत लिहिलं आहे की,'साराची संवादफेक खूपच निरस वाटते'. तर कुणीतरी लिहिलंय,'तिचा अभिनय भावनाशून्य आहे. एक संधी मिळालेली ती देखील फुकट घालवली'.