Ae Watan Mere Watan: 'ऐ नया हिंदूस्थान' म्हणतं सारा खान नव्या रुपात...टिझर रिलीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sara Ali Khan

Ae Watan Mere Watan: 'ऐ नया हिंदूस्थान' म्हणतं सारा खान नव्या रुपात...टिझर रिलीज

अभिनेत्री सारा अली खान बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आतापर्यंत चित्रपटांमध्ये आपल्या नखरेबाज शैलीने चाहत्यांची मनं जिंकणारी सारा यावेळी काही वेगळे घेऊन आली आहे. सारा अली खानचा आगामी चित्रपट 'ए वतन मेरे वतन'चा फर्स्ट लूक सोमवारी रिलीज करण्यात आला आहे. छोट्या टीझरमध्ये 'ए वतन मेरे वतन' ची घोषणा करण्यात आली आहे.

सारा अली खान टीझरमध्ये हळूच एका अंधाऱ्या खोलीत येते, आणि रेडिओ सदृश यंत्र सुरू करून बोलायला सुरू करते. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘भारत छोडो’ आंदोलनाचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात, आणि अशातच तिच्या घराचे दार ठोठावल्याचा आवाज येतो.

हेही वाचा: Aparna Balamurali: राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्रींसोबत गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्याचे निलंबन

सारा अली खानचा आगामी चित्रपट 'ए वतन मेरे वतन' ची घोषणा OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर करण्यात आली आहे. 23 जानेवारी रोजी, प्राइम व्हिडिओने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर साराच्या 'ए वतन मेरे वतन' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे.

खरे तर सारा अली खान 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटात फ्रीडम फायटर उषा मेहता यांची भूमिका साकारत आहे. सीक्रेट रेडिओ सेवेच्या माध्यमातून १९४२ मध्ये मुंबईच्या गोवालिया टँक मैदानात सुरू झालेल्या भारत छोडो आंदोलनात उषा मेहता यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरब फारूकी यांनी 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि कन्नन अय्यर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

याविषयी करण जोहर म्हणाला, “या चित्रपटाच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील इतिहासातील न उलगडलेली पानं उलगडली जाणार आहेत. आजवर तुम्ही सारा अली खानला अशा भुमिकांमध्ये पाहिलेच नसेल.अशा परिस्थितीत सारा अली खानचा हा चित्रपट पाहणे खरोखरच मजेशीर असेल. 'ए वतन मेरे वतन' केवळ OTT प्लॅटफॉर्म Amazon Prive व्हिडिओवर प्रदर्शित होईल.

टॅग्स :actressSara Ali Khan