esakal | Video : मालदिवमध्ये सारा-जान्हवीचं एकत्र वर्कआऊट

बोलून बातमी शोधा

sara ali khan and janhvi kapoor
Video : मालदिवमध्ये सारा-जान्हवीचं एकत्र वर्कआऊट
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनामुळे सध्या चित्रपटांचे शूटिंग बंद करण्यात आले आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सध्या परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. अभिनेत्री सारा आली खान आणि जान्हवी कपूर या दोघीसुद्धा मालदिवला फिरायला गेले आहेत. या दोघींचा तिथल्या हॉटेलमध्ये एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोघी एकत्र वर्कआऊट करताना दिसत आहेत. नम्रता पुरोहित या फिटनेस ट्रेनरकडून सारा आणि जान्हवी ट्रेनिंग घेत आहेत.

बऱ्याच वर्षांपासून जान्हवी आणि सारा ‘पिलेट्स’चे ट्रेनिंग घेत आहेत. साराने एका मुलाखतीत सांगितले की, ‘पिलेट्स हा माझ्या फिटनेसचा महत्त्वपूर्ण भाह आहे.’ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सारा आणि जान्हवीच्या व्हिडीओमध्ये त्या दोघी आकर्षक जिम आऊटफिटमध्ये दिसत आहेत. फ्रन्ट किक व्हिथ स्कॅट, डॅन्कि किक असे विविध व्यायामाचे प्रकार करताना त्या दिसतायत. हा व्यायाम करताना जान्हवी आणि सारामध्ये डेडिकेशन दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत साराने कॅप्शन दिले, 'गो विथ द फ्लो'.

हेही वाचा : अभिषेकने सांगितला ऐश्वर्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा

सारा आणि जान्हवीच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. दोघींच्या डेडिकेशन आणि हार्डवर्कचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी साराचे वजन खूप जास्त होते. पौष्टीक आहार आणि नियमित व्यायाम करून तिने वजन कमी केले. प्रसिद्ध चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये सारा वडिल सैफ अली खानसोबत आली होती. त्यावेळी साराने तिची फिटनेस जर्नी प्रेक्षकांना सांगितली होती. साराला जंक फूडची खूप आवड होती. पण आता ती फक्त हेल्दी फूड खाते असे तिने शोमध्ये सांगितले होते.