Sara ali khan birthday: लठ्ठपणामुळे झाली होती ट्रोल, आज तीच सारा लावतेय वेड
sara ali khan birthday : सारा आली खान म्हणजे बॉलीवुड मधली चर्चेतली अभिनेत्री. अत्यंत कमी वयात तिने यशाच शिखर गाठलं. आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली तर सडेतोड बोलण्याच्या शैलीने अनेकांची बोलती बंद केली. अशा बोल्ड आणि बिनधास्त साराचा आज वाढदिवस. सारा आज आपला २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज जरी तिने सर्वांना भुरळ घातली असली तरी एकेकाळी मात्रा सराला (sara ali khan) तिच्या तब्येतीवरून खूप ट्रोल केले गेले होते आणि कारण होते तिचे वाढलेले वजन.. जाणून घेऊया तो किस्सा..
साराची खास बात म्हणजे घरामध्ये वडिलांचं म्हणजे प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानचं बॉलीवूड मध्ये इतकं वजन असतानाही तिने स्वतःच्या हिमतीवर चित्रपट मिळवले. आई, वडील आणि आजी सर्वच अभिनय क्षेत्रातले दिग्गज असल्याने अभिनयाचे संस्कार तिला लहानपणापासून मिळाले आहेत. तिने आपल्या लहानपणीच ठरवले होते की, आपल्याला अभिनेत्रीच व्हायचय. पण अडचण होती ते तिचं वजन..
साराने आपलं स्वप्न बोलून दाखवलं खरं पण सध्या अभिनेत्री जशा असतात तसं तिच्यात काहीही नव्हतं. म्हणजे एक वेळ अशी होती तेव्हा साराचं वजन ९६ किलो होतं. वाढत्या वजनामुळे आणि लठ्ठपणामुळे सारा नेहमी ट्रोल व्हायची, मात्र तिने याकडे लक्ष दिलं नाही. लठ्ठपणा हा आपल्या करियर मधील मोठा अडथळा आहे हे जाणून तिने स्वतःत बदल केले. कॉलेज मध्ये असताना तिला हे जाणवले आणि तिने व्यायाम आणि डाएट करायला सुरुवात केली. या चंदेरी दुनियेत स्वतःला आणायचे असेल तर आपल्यालाही तसेच दिसावे लागेल, हे तिने ओळखून कोणत्याही हॉट अभिनेत्रीला लाजवेल असे तिने स्वतःला घडवले.
सारा बारीक होताच तिच्याबाबत सकारात्मक चर्चाना उधाण आले आणि बघता बघता तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. 2018मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रमुख भूमिकेत झळकला होता. साराने तिच्या पहिल्याच चित्रपटातून चाहत्यांची मने जिंकली. यानंतर सारा रणवीर सिंहसोबत ‘सिम्बा’ या चित्रपटात दिसली.नंतर तिने कार्तिक आर्यनसोबत ‘लव आज कल’ हा चित्रपट केला तर पुढे वरुण धवनसोबत ‘कुली नंबर’ या चित्रपटात दिसली होती. ‘अतरंगी रे’ या चित्रपटानंतर लवकरच आता तिचा पुढचा सिनेमा येणार आहे. एकेकाळी लठ्ठपणामुळे ट्रोल झालेली सारा आज प्रेक्षकांच्या आवडती अभिनेत्री बनली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.