sara ali khan
sara ali khan

साराच्या मांडीवर बसलेली ही 'क्युट' मुलगी आहे तरी कोण?

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री सारा अली सोशल मीडियीवर नेहमीच सक्रिय असते. तिच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियीवर पोस्ट करत असते. नुकताच साराने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमधील छोटी मुलगी कोण आहे, हा प्रश्न सर्वांना पडला होता. फोटोमध्ये साराची बहिण इनाया साराच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. इनाया ही अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खानची मुलगी आहे. 

सोहा आली खान ही साराची आत्या आहे. कुणाल आणि सोहाने 2015 मध्ये लग्नगाठ बांधली.  2017 मध्ये सोहाने इनायाला जन्म दिला. साराने सोशल मीडियावर पोस्ट केलेला इनायाच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

सारा अली खानच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, ती दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे' मध्ये अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसणार आहे. या आधी सारा ‘कुली नंबर 1’चित्रपटात अभिनेता वरूण धवनसोबत दिसली होती. साराने तिच्या करियरची सुरूवात केदारनाथ या चित्रपटातून केली. त्यानंतर लव आज कल 2, सिम्बासारख्या चित्रपटात साराने काम केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com