
Gaslight Review: दिग्दर्शक पवन कृपलानी यांचा गॅसलाइट हा सिनेमा डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात सारा अली खानसोबत विक्रांत मस्सी, चित्रांगदा सिंग, अक्षय ओबेरॉय, राहुल देव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
कसा आहे गॅसलाइट सिनेमा.. पाहण्यासारखा आहे का? चला बघूया...
(sara ali khan new movie gaslight review starring vikrant massey )
काय आहे सिनेमाची कथा?
व्हील चेअरवर बसलेली, मीशा (सारा अली खान) तिच्या वडिलांशी पुन्हा नातं जोडण्यासाठी १५ वर्षांनी गुजरातला परतते.
मात्र, तिच्या वाड्यात आल्यानंतर तिला कळले की तिचे वडील तिथे नाहीत. मीशाची सावत्र आई रुक्मिणी तिला समजावते की तिचे वडील काही कामासाठी बाहेर गेले आहेत.
वडिलांच्या गैरहजेरीत मीशासोबत घडणाऱ्या विचित्र घटनांमुळे तिला आपल्या वडिलांसोबत काहीतरी चुकीचं घडलं आहे याची जाणीव होते.
पण मिशा वारंवार सांगूनही तिच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. यादरम्यान मिशा इस्टेट मॅनेजर कपिलला भेटते आणि ते मिळून मीशाच्या वडिलांचं नेमकं काय झालंय याचा तपास घेतात.
आता मीशा आणि कपिल त्यांच्या मिशनमध्ये यशस्वी होतील का? मिशाच्या बाबांचं नेमकं काय झालंय हे पाहण्यासाठी तुम्हाला हॉटस्टारवर गॅसलाइट सिनेमा पाहावा लागेल.
थोडय़ा पैशासाठी माणूस सगळ्या मर्यादा कशा ओलांडू शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
सिनेमा पहावा की पाहू नये?
सिनेमाची कथा जरी चांगली असली तरीही ती अत्यंत प्रेडिक्टेबल आहे.. अशा कथा आपण अनेक पुस्तकांमध्ये आणि क्राईम शोमध्ये वाचल्या. याशिवाय अनेक सिनेमांमध्ये अशा कथा पाहिल्या आहेत.
त्यामुळे सुरुवातीच्या काही मिनिटांतच संपूर्ण कथेचा अंदाज यायला लागतो. त्यामुळे एका क्षणी हा सिनेमा कंटाळवाणा वाटतो.
जर तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर सिनेमांची आवड असेल तर गॅसलाईट सिनेमा तुम्ही एकदा पाहू शकता. पण जर तुम्हाला काही नवीन पाहायचे असेल तर मात्र गॅसलाईट तुमची घोर निराशा करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.