Ram Charan Video: रामचरणची सर्वात मोठी फॅन कोण? दोन मुलींनी एकमेकांच्या झिंज्या उपटल्या, पोरांनी घेतली मजा

मीडिया रिपोर्टनुसार ही घटना आंध्रप्रदेशमध्ये घडली आहे
 ram charan, ram charan fan viral video, ram charan fans, rrr, jr ntr
ram charan, ram charan fan viral video, ram charan fans, rrr, jr ntrSAKAL
Updated on

Ram Charan Video Viral Video: RRR सिनेमामुळे राम चरण आणि Jr. NTR या दोघांच्या फॅन फॉलोईंगमध्ये प्रचंड वाढ झाली. राम चरणचं देशभरात नव्हे तर जगभरात फॅन फॉलोईंग वाढलं आहे.

फॅन फॉलोईंग इतकं वाढलं आहे कि रामचरणचं फॅन नक्की कोण यामध्ये दोन तरुणींमध्ये मारामारी झाली. काय आहे नेमकं प्रकरण. जाणून घेऊया.

(Who is Ram Charan biggest fan? There was a fight between two girls, the boys had fun)

 ram charan, ram charan fan viral video, ram charan fans, rrr, jr ntr
Bholaa Review: अजय भाऊंनी पुन्हा मन जिंकलं..! उत्कृष्ट अभिनय आणि दमदार अ‍ॅक्शनचा तडका म्हणजे 'भोला'

साऊथचे प्रेक्षक हे कलाकारांसाठी फारच वेडे असतात असं म्हटलं जातं. ते आपल्या कलाकारांवर जीवापाड प्रेम करतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

या व्हिडिओत दोन कॉलेज तरुणी एकमेकांमध्ये हाणामारी करत आहेत. कारण काय तर.. राम चरणची सर्वात मोठी चाहती कोण? हा प्रश्न विचारता विचारता दोन तरुणींची एकमेकांमध्ये मारामारी झाली.

 ram charan, ram charan fan viral video, ram charan fans, rrr, jr ntr
Ram Charan Video: रामचरणची सर्वात मोठी फॅन कोण? दोन मुलींनी एकमेकांच्या झिंज्या उपटल्या, पोरांनी घेतली मजा

मीडिया रिपोर्टनुसार ही घटना आंध्रप्रदेशमध्ये घडली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की या मुली त्वेशाने एकमेकांना मारत आहेत.

एकमेकांना अश्लिल शिव्या घालतायेत. अन् आसपासची मुलं त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देतायेत. एकंदर मुलींच्या भांडणाची मुलं मजा घेत आहेत.

राम चरण हा साऊथ सिनेसृष्टीतील मोठा सुपरस्टार आहे. RRR या चित्रपटामुळे तो जागतिक स्तरावरही खूप लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटातील नाटु-नाटु या गाण्यासाठी ऑस्कर जिंकल्यापासून राम चरण सह सर्व स्टारकास्ट चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी राम चरण यांचा वाढदिवस अतिशय सुंदर पद्धतीने साजरा करण्यात आला. या सेलिब्रशनमध्ये 'हॅपी बर्थडे राम चरण'चे पोस्टर आहे.

राम चरणचा आगामी RC 15 बद्दल बोललो, तर तो एक अॅक्शन ड्रामा चित्रपट असणार आहे. ते तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषांमध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com