esakal | ...पण तैमुर कुठे आहे? सारावर प्रश्नांचा भडीमार 
sakal

बोलून बातमी शोधा

sara

...पण तैमुर कुठे आहे? सारावर प्रश्नांचा भडीमार 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - केदारनाथ आणि सिंबामधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या सारा अली खानचे इन्टाग्रामवर देखील अनेक चहते आहे. या चाहत्यांनी मात्र काल तिला तैमुरचं काय? असा प्रश्न विचारुन हैराण केलं आहे. 

झाले असे की, काल 'वर्ल्ड सिबलिंग डे'निमित्त साराने तिचा आणि इब्राहीमचा फोटो इन्टाग्रामवर शेअर केला. तसेच तिने आपल्या भावाला 'वर्ल्ड सिबलिंग डे'च्या शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी मात्र तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. इब्राहीमचा फोटो शेअर केला मग भाऊ म्हणून तैमुरचा का नाही असा प्रश्न चाहत्यांनी तिला विचारला आहे. 

याआधी साराने तैमुरसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहे. तैमुरसोबतचा भाऊबिजेचा फोटो तर तिच्या चाहत्यांना विशेष आवडला होता. मग आता त्याचा फोटो का नाही? अशा प्रतिक्रीया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. 

loading image