
Tunisha Sharma Suicide Case: अखेर 70 दिवसांनी शीझान खान तुरुंगाबाहेर! मुलाला पाहताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शीजान खानला आज 5 मार्च 2023 रोजी तुरुंगातुन सोडण्यात आले. शीझान खानला १ लाख रुपये भरुन वसई कोर्टानं जामीन मंजूर केला जामीन मिळाला मात्र शीझान खानला आपला पासपोर्ट कोर्टात जमा करावा लागला आहे.
आज शिझानची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली. यावेळी त्याच्या बहिणी त्याला नेण्यासाठी तुरुंगाबाहेर दिसल्या. तब्बल 70 दिवसांनी शीझान बाहेर आल्यानं त्याच्या बहिणीही भावुक झालेल्या दिसल्या. तर त्याच्या आईला अश्रूं अनावर झाले.
वर्षीय टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी तिच्या शो 'अली बाबा शो'च्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचा आरोप तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि को-स्टार शीझान खानवर होता. अभिनेत्रीच्या आईने शीजानच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर तिला 25 डिसेंबरला अटक करण्यात आली.
सर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अखेर 4 मार्च 2023 रोजी वसई न्यायालयाने शीजनचा जामीन अर्ज स्वीकारला. मात्र, एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला. यासोबतच त्यांचा जामीन अर्ज स्वीकारताना अनेक अटीही घालण्यात आल्या होत्या. देश सोडून जाऊ नये म्हणून त्याला पासपोर्टही सरेंडर करावा लागला. याशिवाय पुराव्यांशी छेडछाड न करण्याच्या सूचनाही त्याला देण्यात आल्या आहेत.