
सारा वैयक्तिक आयुष्यातही जॉली व्यक्ती आहे. मुलाखतींमधून तिची फन साइड नेहमीच दिसून येते. सारा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्या व्हिडीओमधील साराला तुम्ही ओळखू शकणार नाही !
मुंबई : सारा अली खानने काही वेळ्तच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. केदारनाथ आणि सिंबा हे दोन चित्रपट तिने केले आणि दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले. साराचे आई वडील दोघेही सेलिब्रिटी आहेत आणि तरीही साराने स्वत:ला सिद्ध केलं आहे. सारा वैयक्तिक आयुष्यातही जॉली व्यक्ती आहे. मुलाखतींमधून तिची फन साइड नेहमीच दिसून येते. सारा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्या व्हिडीओमधील साराला तुम्ही ओळखू शकणार नाही !
Happy Birthday : आई-वडिलांच्या लग्नाआधीच जन्मली होती 'ही' अभिनेत्री!
सारा बिनधास्त आहे आणि त्यामुळेच ती खुलेपणाने बोलते. बॉलिवूडमध्ये येण्याआधी सारा जाड होती. आता तीने स्वत: ला फिट केले आहे. तिचे जीम लुक नेहमीच फेमस होतात. सारा कोणत्याही आऊटफिटमध्ये छान दिसते. काहीवेळा क्युट तर कधी हॉट आणि बोल्ड लुक पाहायला मिळतो. सारा आधी हेल्दी होती आणि हे तिनेही मान्य केलं आहे. इन्स्टाग्रामवर तिने स्वत:चे जुने फोटो शेअर केले आहेत. याआधीचा तिचा लुक पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पाहा सारानेच शेअर केलेला एक मजेशीर व्हिडीओ. यामध्ये सारा विमानात बसली आहे. तिच्या दोन मैत्रिणींसह ती दिसते आहे. या व्हिडीओमध्ये सारा वेगळीच दिसते आहे आणि अतिशय मजेशीर अंदाज समोर आला आहे.
सारा या व्हिडीओमध्ये मस्ती करताना दिसते आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'सर जो तेरा टकराए' हे गाणं वाजत आहे. आता सारा फिट दिसत असली तरी याआधी जाडेपणामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. त्यावेळी तिचं वजन 96 किलो एवढं होतं. आताचा तिचा हा व्हिडीओ पाहून तिला ओळखणेही अनेकांना कठीण झाले आहे.
प्रियांकाचा 'तो' हॉट ड्रेस, 20 वर्षांपूर्वीची 'या' अभिनेत्रीची फॅशन
अस असलं तरी मात्र साराचा हा फन व्हिडीओ चाहत्यांना आवडला आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. सारा सध्या डेविद धवन यांच्या 'कुली नंबर 1' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. सैफ आणि दीपिका यांच्या 'लव आज कल' चित्रपटाचा सिक्वेल 'लव आजकल 2' मध्येही ती झळकणार आहे. त्यामध्ये कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करताना ती दिसणार आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डे म्हणजेच 14 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. तर, 'कुली नंबर 1' 1 मे 2020 ला रिलिज होणार आहे.