Arjun often pokes fun at Anushka in the comments section of her post अर्जुन कपूरने 'द रॉक' चा संबंध थेट हॉलीवूड स्टार ड्वेन जॉन्सन, जो 'द रॉक' नावानेही ओळखला जातो थेट त्याच्याशी लावला.Varun Dhavan,Virat Kohli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anushka Sharma and Arjun Kapoor

अर्जून कपूर म्हणाला,''तू तर भारताची...''

सध्या विराट कोहली(Virat kohli) पत्नी अनुष्का शर्मासोबत(Anushka Sharma) आपला फॅमिली टाईम एन्जॉय करतोय. एरव्ही देखील हे पती-पत्नी आपापल्या प्रोफेशनमध्ये बिझी असले तरी त्यातनं वेळ काढीत एकमेकांसोबत 'मी टाईम' एन्जॉय करताना दिसतात. याचा दाखला म्हणजे आपल्या सोशल मीडियावरनं त्यांनी शेअर केलेले बरेच फोटो आणि व्हिडिओ. नुकताच विराटने अनुष्कासोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. दोघांनीही त्या सेल्फीत एकमेकांना मॅचिंग होईल असे पांढ-या रंगाचे टी-शर्ट घातले आहेत. तर विराटने त्या फोटोवर आपल्या पत्नीसाठी कमेंटही केलीय. त्यानं अनुष्काला 'द रॉक' असं म्हटलं आहे.

विराटने शेअर केलेल्या या फोटोवर अनुष्काला 'द रॉक' म्हणून संबोधलं आहे. सोशल मीडियावर नेहमीच सेलिब्रिटींची त्यांच्या फोटोवरून मजा-मस्करी करणा-या अर्जुन कपूरनं कमेंट्,स करण्याची संधी इथेही सोडलेली नाही. अर्जुन कपूरने 'द रॉक' चा संबंध थेट हॉलीवूड स्टार ड्वेन जॉन्सन, जो 'द रॉक' नावानेही ओळखला जातो थेट त्याच्याशी लावलाय. तो म्हणाला, "मला माहित नाही ड्वेन जॉन्सन आणि त्याचा मोठा फॅन असलेला अभिनेता वरुण धवन मला तुझं हे नवीन नामकरण करण्यासाठी परवानगी देतील की नाही, पण तरीही मी तुझं हे नवीन 'नीक' नाव ठेवत आहे ....#देसीड्वेन."

वरुण धवन हा हॉलीवूड स्टार ड्वेन जॉन्सनचा मोठा फॅन आहे ही गोष्ट आता सर्वपरिचित आहे. वरुणने स्वतःच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं विविध प्रसंगी ड्वेन जॉन्सनविषयीचं आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे. २०१९ मध्ये वरुणने ड्वेन जॉन्सनच्या 'हॉब्स अॅन्ड शॉ' या सिनेमावर आपलं मत व्यक्त करताना भरभरून कौतूकही केलं होतं. तेव्हा ड्वेनने वरुणच्या या कमेंटला उत्तर देताना त्याचे धन्यवाद व्यक्त केले होते. तो म्हणाला होता,"हे मित्रा.आभारी आहे तू हा सिनेमा पाहिलास. तुला तो आवडला त्यावर तू व्यक्त झालास. यू आर द बेस्ट."

Arjun Kapoor,Anushka Sharma

Arjun Kapoor,Anushka Sharma

अर्जुन नेहमीच अनुष्काला तिच्या फोटो किंवा व्हिडिओवरनं चिडवत आलेला आहे. असाच एक व्हिडिओ अनुष्कानं तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. ज्यात ती पडद्याच्या मागनं हळूच डोकं बाहेर काढतेय. डोळे मोठे करीत,रुंदावलेल्या हस-या चेह-यानं कॅमेरा अगदी जवळ आणून त्याच्याकडे पाहतेय. या व्हिडिओला तीनं कॅप्शन दिलंय की,"कुणीतरी आता पॅकअप म्हणेल का?" अनुष्काच्या या व्हिडिओवर तिला चिडवण्याच्या उद्देशाने अर्जुनने कमेंट करीत लिहिलंय की,''वमिका आजुबाजूला असताना आशा आहे तू असे चेहरे तिच्यासमोर करणार नाही.''

अनुष्कानं बाळाला जन्म दिल्यानंतर बरेच दिवस शुटिंगपासून स्वतःला दूर ठेवलं होतं. शाहरुख खान,कतरिना कैफ अभिनित झिरो या सिनेमात ती शेवटची दिसली होती. अदयाप तिनं कोणताही सिनेमा साइन केलेला नाही. पण आपल्या प्रॉडक्श हाऊसच्या माध्यमातनं वेबसिरीज निर्मितीमध्ये मात्र आता थोडी बिझी आहे. तर अर्जुन कपूर नुकताच 'भूत पोलिस' सिनेमात दिसला होता. आगामी एक 'व्हिलन-२' या सिनेमातही तो काम करीत आहे.

loading image
go to top