Ex बॉयफ्रेंडसोबत दिसली सारा, नक्की मामला आहे तरी काय ?

वृत्तसंस्था
Monday, 13 January 2020

सारा वैयक्तिक आयुष्यातही जॉली व्यक्ती आहे. तिची फॅनफोलॉइंग दिवसेंदिवस वाढत आहे. सारा आणि तिच्या बॉयफ्रेंडची चर्चा खूप झालीच. पण, काही दिवसांपूर्वीच ते दोघे एकत्र नसल्याची चर्चा सुरु होती.आता पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंडसोबत ती दिसली आहे.

मुंबई : सारा अली खानने काही वेळ्तच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. केदारनाथ आणि सिंबा हे दोन चित्रपट तिने केले आणि दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले. साराचे आई वडील दोघेही सेलिब्रिटी आहेत आणि तरीही साराने स्वत:ला सिद्ध केलं आहे. सारा वैयक्तिक आयुष्यातही जॉली व्यक्ती आहे. मुलाखतींमधून तिची फन साइड नेहमीच दिसून येते. तिची फॅनफोलॉइंग दिवसेंदिवस वाढत आहे. आणि सेलिब्रिटींच्या चाहत्यांची कमीदेखील नाही. सारा आणि तिच्या बॉयफ्रेंडची चर्चा खूप झालीच. पण, काही दिवसांपूर्वीच ते दोघे एकत्र नसल्याची चर्चा सुरु होती.

कबीर सिंगची प्रिती आहे बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड

आता पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंडसोबत ती दिसली आहे. त्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. सारा आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या लिंकअपच्या चर्चा बी-टाऊनमध्ये सुरु होत्या. कॉफी विथ करणमध्येही साराने कार्तिकला आवडण्याचा खुलासा केला होता. पण, काही दिवसांपूर्वीच या गोड कपलचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली. कधी डिनर डेट तर कधी वाढदिवस, दोघांना एकमेकांसोबत अनेकदा स्पॉट करण्यात आले. सोशल मीडियावरही य़ा दोघांनी एकमेकांसोबतचे क्युट फोटो शेअर केले. पण, कार्तिक आणि साराने त्यांच्या नात्याचा अधिकृतपणे कधीच खुलासा केला नाही. 

नुकतचं या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. त्यानंतर बी-टाऊनमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. या दोघांनी पॅपराझींना पोस देत काही फोटोही क्लिक केले. मुंबईच्या 'मैडॉक  फिल्म ऑफिस' च्या बाहेर त्यांना स्पॉट करण्यात आले. पिंकविला साइटच्या इनस्टाग्राम अकाउंटवर त्यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. प्रोजेक्ट संदर्भात त्यांची मीटिंग असल्याचं सांगितलं जात आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

And that’s a schedule wrap for me in Delhi 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

साराच्या ब्रेकअपनंतर त्याचं नाव न्यु कमर अनन्या पांडेशी जोडलं गेलं होतं. अनन्या पांडे कार्तिक हे दोघं ‘पत्नी पत्नी और वो’या चित्रपटातून एकत्र झळकले होते. पण, आता पुन्हा एकदा सारा आणि आर्य़नला एकत्र पाहून नेटकऱ्यांमध्ये उलट-सुलट चर्चा होत आहेत. 

मृण्मयी देशपांडेचे दिग्दर्शनात पदार्पण; 'मन फकीरा'चे मोशन पोस्टर लॉन्च 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 #saraalikhan #kartikaaryan

A post shared by sara&kartik (@sarakartik_fp) on

सारा सध्या डेविद धवन यांच्या 'कुली नंबर 1' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. सैफ आणि दीपिका यांच्या 'लव आज कल' चित्रपटाचा सिक्वेल 'लव आजकल 2' मध्येही ती झळकणार आहे. त्यामध्ये कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करताना ती दिसणार आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डेला पुढच्या वर्षी 14 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. तर, 'कुली नंबर 1' 1 मे 2020 ला रिलिज होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by sara&kartik (@sarakartik_fp) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sara Ali Khan spotted with rumored ex boyfriend and Karthik Aryan