
सातारा : दुखः सर्वांनाच आहे. मात्र रडत बसाल तर कायम रडतच राहाल. मला हे नाही मिळाले, ते नाही मिळाले, माझे वय झालंय आता मी काय करु अशा तक्रारी करीत राहाल तर आयुष्यभर तक्रारीच कराल आणि रडतच बसाल. भाई लाेग आप अपना मेरुदंड सिधा रखो....म्हणजेच आपल्या पाठीचा कणा सरळ ठेवा, तणाव घेऊ नका असा सल्ला बॉलिवूडमधील जग्गू दादा म्हणजे जॅकी श्रॉफने दिला आहे. आयुष्यात आलेल्या कठीण प्रसगांशी कशा पद्धतीने तोंड द्यावे याबाबतचा जॅकीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जॅकीने जीवन दर्शनाबद्दल खूप चांगली गोष्ट सांगितली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत अनलॉक 1 च्या धर्तीवर काही राज्यांमध्ये उद्योग, व्यवसाय सुरु झालेले आहेत. बहुतांश ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये दैनंदिन व्यवहार सुरु झालेले आहे. अनेक ठिकाणी दळणवळण सुरु झाली आहे. टप्प्या टप्याने एक एक गोष्ट सुरु केली जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. तरी देखील युवकांमध्ये असलेली नकारात्मक त्यांच्या मनातून काही केले जाईना असे चित्र सध्या देशात आहे. काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींचा व्यवसाय ठप्प झाला आहे. परिणामी युवा वर्ग आत्महत्या करीत आहे. लॉकडाउनच्या काळात अनेक सेलेब्रेटी उदासीनता टाळण्यासाठी स्वतः कसे घडले, कठीण काळात काय केले पाहिजे हे आपल्या चाहत्यांना सांगत होते.
याचदरम्यान, अभिनेता जॅकी श्रॉफने एक व्हिडिओ करुन सोशल मिडियावर पोस्ट केला होता. सध्या हा व्हिडिआे व्हायरल हाेत आहे. ज्यामध्ये जॅकी जीवन दर्शनाबद्दल खूप चांगली गोष्ट सांगताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये जॅकी म्हणत आहे, आपल्या पाठीचा कणा सरळ ठेवा, इतर तणाव घेऊ नका. हे सांगताना त्याने स्वतः आपल्या कुटुंबाचेही एक उदाहरण दिले. त्यानंतर जॅकी आपल्या जडणघडण विषयी देखील भरभरुन बोलत आहे. तो म्हणतो मी एक साधा ट्रॅव्हल एजंट होतो. मी शेफ बनू इच्छित होतो आणखी बरेच काही बनू इच्छित होतो पण अभिनेता बनलो, मॉडेल बनलो. देवाकडे काही मागितले नाही मात्र कामाशी प्रामाणिक राहिलो. त्यामुळे जे काम वाट्याला आले ते केले. त्यामुळे तुम्ही रडत बसू नका. रडत राहिला तर रडतच बसाल. तुम्ही तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा बाकी टेंशन घेऊ नका. डिप्रेशन वगैरे काही नसते. ते दूर करण्यासाठी गोळ्या तर अजिबात घेऊन नका. त्याऐवजी स्वतःमध्ये उर्जामध्ये निर्माण करा. चेहरऱ्यावर हसू ठेवा. आयुष्यात शिस्त महत्वाची आहे. तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक रहा. वेळेचे तंतोतंत पालन करा. दूसऱ्यांवर कधी टिका करु नका. कान उघडणे ठेवून मोठ्यांचे ऐकले म्हणून मी घडलाे. तुम्ही या सर्व गोष्टींचे पालन करा यश तुमच्या पायाशी लोळण घालेल असेही जॅकी नमूद करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.