Satellite Shankar: सॅटेलाइट शंकरचा पोस्टर रिलिज, सुरज पांचोलीचा दमदार लुक

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

Satellite Shankar: बॉलिवूड अभिनेता सुरज पांचोल लवकरच एका नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचं पोस्टर नुकतचं प्रदर्शित झालं आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुरज पांचोल लवकरच एका नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सॅटेलाइट शंकर' असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच त्याचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. पोस्टरसोबत चित्रपट प्रदर्शित होण्याती तारीखही देण्यात आलेय. सुरज पांचोलीचा बरेच दिवसांनी नव्या चित्रपटामधून झळकणार आहे.

याआधी सॅटेलाइट शंकर हा सिनेमा 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता.आता मात्र तो येत्या 15 नोहेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन पोस्टर शेअर केला आहे. त्यामध्ये सुरज काळ्या रंगाच्या टि-शर्ट आणि आर्मी पॅंटमध्ये दिसतोय. पाठीमागे भारताचा नकाशा आहे ज्यामध्ये 'सर्वच हिरो बैटलफिल्डवर नाही जात' अशी टॅगलाईन दिली आहे. 

पोस्टरची थीम हटके आहे ज्यामध्ये सुरजच्या मागे भारताचा नकाशा दिसतोय. त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरज दिसतो आहे. चित्रपटामध्ये सुरज एका आर्मी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाची कथा आर्मी मॅनच्या जीवनावर आधारीत असणार आहे. आर्मीमधील प्रत्येक जवानाला देशाच्या सुरक्षेसाठी किती आव्हानांचा सामना करावा लागतो या संर्घषावर आधारीत ही कथा असणार आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सुंदर काश्मिरमध्ये या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली. चित्रपटाचा अधिकतर भाग हा उत्तर भारतामध्ये आणि देशातील 10 राज्यांमध्ये शुट करण्यात आला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#BeFearless

A post shared by Sooraj Pancholi (@soorajpancholi) on

चित्रपटाचं दिग्दर्शन इरफान कमल यांनी केलं असून मुराद खेतानी आणि अश्विनी वरदे यांनी निर्देशन केलं आहे. सुरज हा अभिनेता आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा आहे. सुरजने 2015 मध्ये 'हिरो' या चित्रपटासह बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satellite Shankar Sooraj Pancholi s new film poster is out now