'हार्टअटॅक आला वाटतं..', कौशिक यांच्या निधनापूर्वीच एका युजरनं पोस्टवर केलेली कमेंट,काय आहे प्रकरण? Satish Kaushik Death..last post viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satish Kaushik Death..last post viral

Satish Kaushik: 'हार्टअटॅक आला वाटतं..', कौशिक यांच्या निधनापूर्वीच एका युजरनं पोस्टवर केलेली कमेंट,काय आहे प्रकरण?

Satish Kaushik यांचं निधन झालं आहे, त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. सतिश कौशिक दिल्लीत आपल्या मित्राला भेटायला गेले होते. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच त्यांना वाटेत हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

कोण,कधी,कसा या जगाचा निरोप घेईल हे सांगणं कठीण आहे पण सतिश कौशिक यांच्या शेवटच्या पोस्टवर एका व्यक्तीन केलेल्या कमेंटची चर्चा मात्र दिग्दर्शकाच्या निधनानंतर जोरदार सुरू झाली आहे.

दोन दिवस आधीच सतिश कौशिक यांनी जावेद अख्तर यांच्याकडील होळीच्या पार्टीतले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यामध्ये सतिश कौशिक अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींसोबत होळी साजरी करताना दिसत आहेत.

ही पोस्ट त्यांची शेवटची पोस्ट ठरली. या त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर त्यांच्या निधनानंतर हजारो कमेंट्स आल्या. पण यातील एका कमेंटला वाचून मात्र प्रत्येकजण हैराण झाला आहे. (Satish Kaushik Death..last post viral)

Satisk Kaushik Last Post Vral

Satisk Kaushik Last Post Vral

सतिश कौशिक यांनी होळीचे चार फोटो शेअर केले होते. यात पहिल्या फोटोत अली फजल आणि ऋचा चड्ढा एकत्र दिसत आहेत. या फोटोत मागे एक मुलगी उभी आहे जिचे थोडे विचित्र रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्या मुलीच्या रिअॅक्शनवर पारस गुप्ता नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरनं कमेंट केलं होतं.

त्यानं जवळपास २४ तासापूर्वी ही कमेंट करत लिहिलं होतं, 'सर,तुमच्या मागे पांढऱ्य रंगाच्या कुर्त्यामध्ये जी मुलगी आहे..तिला सांभाळा..कदाचित तिला हार्टअटॅक आलाय वाटतं'.

पारस नावाच्या त्या व्यक्तीनं काय विचार करुन ती कमेंट लिहिली होती हे सांगणं कठीण पण तो जे मजे-मजेत बोलला ते अशा पद्धतीनं खरं होईल असा कोणी विचार केला नव्हता.

पारसच्या त्या कमेंटवर एका युजरनं रिप्लाय देत लिहिलं,'तू बोललास ते खरं झालं..फक्त माणूस बदलला.'

एकानं लहिलं की,'हे कसं शक्य आहे..खरंच..सतिश कौशिक यांना अटॅक आला'.

हेही वाचा: डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी..पण गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा...

Satisk Kaushik Last Post Vral

Satisk Kaushik Last Post Vral

अनुपम खेरनी देखील सतिश कौशिक यांचे शेवटचे क्षण शेअर करत दिल्लीत त्यांचे पोस्टमार्टम केल्यानंतर त्यांना मुंबईत आणलं जाईल अशी माहिती मीडियाला दिली. एअर अॅम्ब्युलन्सनं कौशिक यांना मुंबईत आणलं जाईल. दुपारी ३ ते ४ च्या सुमारास सतिश कौशिक यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती आहे.