Satish Kaushik Last Movie: हा असणार सतीश कौशिक यांचा अखेरचा सिनेमा, कंगणासोबत दिसणार राजकीय भूमिकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satish kaushik, satish kaushik last movie, emergency movie, kangana ranaut

Satish Kaushik Last Movie: हा असणार सतीश कौशिक यांचा अखेरचा सिनेमा, कंगणासोबत दिसणार राजकीय भूमिकेत

Satish Kaushik Passed Away: आज पहाटे सतीश कौशिक यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते सतिश कौशिक अशी सतीश कौशिक यांची ओळख होती.

सतीश कौशिक यांच्या अकस्मात निधनाने सर्व प्रेक्षकांना आणि कलाकारांना धक्का बसलाय. सतीश कौशिक यांचा अखेरचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

(This will be the last movie of Satish Kaushik, who will be seen in a political role with Kangana ranaut)

सतीश कौशिक यांनी आजवर अनेक सिनेमा, नाटक आणि मालिकांमध्ये काम केलंय. अगदी लालबाग परळ या मराठी सिनेमात सतीश यांनी साकारलेली छोटीशी भूमिका लक्षवेधी ठरली.

आता सतीश यांचा अखेरचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सतीश कंगना रनौत सोबत इमर्जन्सी सिनेमात दिसणार आहेत.

इमर्जन्सी सिनेमात सतीश एका बड्या राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. हि भूमिका म्हणजे जगजीवन राम. जगजीवन राम हे भारतीय काँग्रेसचे संरक्षण मंत्री होते. याच जगजीवन बाबूंच्या भूमिकेत सतीश कौशिक झळकणार आहेत.

इमर्जन्सी हा सतीश कौशिक यांचा अखेरचा सिनेमा ठरणार आहे. अभिनेत्री कंगना रनौतने इमर्जन्सी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून कंगना इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा OTT वर रिलीज होणार असल्याची शक्यता आहे.

कंगनाने सुद्धा सतीश कौशिक यांच्याविषयी भावपूर्ण पोस्ट लिहिली आहे.. "या भयानक बातमीने जाग आली, त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय, एक अतिशय यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक Satish Kaushik जी वैयक्तिकरित्या देखील एक अतिशय दयाळू आणि खरा माणूस होता,

Emergency सिनेमात त्यांना दिग्दर्शन करून मला आनंद झाला. त्यांची आठवण येईल.." ओम शांती अशा शब्दात कंगनाने तिच्या भावना व्यक्त केल्यात.

अभिनयच नव्हे तर लेखक, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका सतीश कौशिक यांनी वखूबी वठवल्या आहेत. त्यांचा जन्म १३ एप्रिल १९६५ रोजी हरियाणा इथं झाला.

बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. १९८७ मध्ये मिस्टर इंडिया या सिनेमातील कॅलेंडर या भूमिकेतून त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली.