
Satish Kaushik : बॉलिवूडचा कॅलेंडर; फक्त अभिनेताच नव्हे तर आणखी बरंच काही!
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतिश कौशिक यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. मिस्टर इंडिया या चित्रपटातल्या कॅलेंडर या भूमिकेमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.
सतिश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९६५ रोजी हरियाणार इथं झाला. बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्यांनी अनेक नाटकांत काम केलं. १९८७ मध्ये मिस्टर इंडिया या चित्रपटामध्ये कॅलेंडर या भूमिकेतून त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये दीवाना मस्ताना या चित्रपटात पप्पू पेजर ही भूमिका निभावली.
१९९० मधील राम लखन आणि १९९७ मधील साजन चले ससुराल या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शो मध्ये बोलताना सतिश कौशिक यांनी हा किस्सा सांगितला होता. कौशिक यांच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांना आपल्या लुक्सबद्दल सतत काळजी वाटत असायची. त्यावेळी त्यांना मंडी या चित्रपटासाठी कास्ट केलं होतं.
त्यावेळी त्यांना श्याम बेनेगल यांच्या एका प्रसिद्ध चित्रपटात काम मिळालं. त्यावेळी त्यांना किडनी स्टोन झाल्याचं समजलं. ते रुग्णालयातून एक्स रे काढून परतत होते, त्यावेळी श्याम बेनेगल यांचा फोन आला आणि त्यांनी फोटो मागवला. सतिश कौशिक सांगतात, "माझ्याकडे माझा फोटो नव्हता आणि मला हे माहित होतं की फोटो बघून माझी कास्टिंग होणार नाही. त्यामुळे मी थोडं डोकं चालवलं. मी त्यांना म्हणालो की माझ्याकडे माझे फोटो नाहीत, पण एक्स रे रिपोर्ट आहे. मी आतून खूप चांगला माणूस आहे. श्यामजींना हे ऐकल्यावर खूप हसू आलं आणि मला मंडी चित्रपटामध्ये काम मिळालं.