'खूप इच्छा होती आणि अजूनही आहे..',छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत संतोषनं व्यक्त केली मनातली इच्छाSantosh Juvekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Santosh Juvekar

Santosh Juvekar:'खूप इच्छा होती आणि अजूनही आहे..',छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत संतोषनं व्यक्त केली मनातली इच्छा

Santosh Juvekar: नाटक,मालिका,सिनेमा आणि आता ओटीटी अशा सर्व माध्यमातून काम करत आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलेला संतोष जुवेकर अनेकदा आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यासंदर्भात भाष्य करणाऱ्या पोस्ट करतो अन् त्या जोरदार चर्चेत आलेल्या पहायला मिळतात.

आता देखील त्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात भाष्य करत पोस्ट केली जिनं सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या पोस्टमधनं संतोषनं शिवरायांचे नाव घेत आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली आहे. त्यानं एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. चला जाणून धेऊया संतोषच्या त्या पोस्ट विषयी. (Satosh Juvekar Post On chatrapati Shivaji maharaj Movie)

'मोरया' आणि 'झेंडा' सिनेमामुळे संतोषचं नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं असं म्हटलं तर स्तुत्य ठरेल. संतोषचा '३६ गुण' सिनेमा नुकताच आपल्या भेटीस येऊन गेला. आपल्याला मराठीत काम मिळत नाही असं मोठं वक्तव्य या सिनेमाच्या निमित्तानं संतोष बोलून गेला होता..ज्याची खूप चर्चा रंगली होती. असो..सध्या संतोषनं जी पोस्ट केलीय त्याविषयी आपण बोलत आहोत.

त्यानं आपल्या 'पावनखिंड' सिनेमातील एक गाणं आहे त्याचा व्हिडीओ पोस्ट करत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर सबंध सिनेमा करायला मिळावा..एक गाणं मिळाल्यानं आपण धन्य झालोच आहोत...असं एकंदरीत त्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा: नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

संतोष जुवकेर आपल्या पोस्टमध्ये म्हणालाय, ''खूप इच्छा होती आणि अजूनही आहे माझ्या शिवबा राजं वर निघणाऱ्या सिनेमात काम करण्याची फक्त एक गाणं मिळालं आनं जीव आपसूक गुंतला, वीज कडाडली अंगात आणि नाद नाद लागेल असा नाचलो
अख्खा सिनेमा मिळाला करायला तर काय आग लागलं ओ
माझ्या राज्याच्या आशिर्वादानं ही संधी पण लवकरच येईल माझ्या आयुष्यात''
जय भवानी..जय शिवराय.. जय जय रघुवीर समर्थ

संतोष जुवेकरच्या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट करत त्याची मनातील इच्छा पूर्ण होवो अशी प्रार्थना करत अभिनेत्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.