सत्यजित राय महोत्सव सांगलीत १९ जानेवारीपासून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

भारतीय चित्रपटसृष्टीची जागतिक स्तरावर पताका फडकवणारे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा महोत्सव येत्या १९ व २० जानेवारीला सांगलीत होत आहे. सांगली फिल्म सोसायटीच्यावतीने होणाऱ्या या महोत्सवाच्या निमित्ताने फेडेरेशन ऑफ फिल्म सोसायटीचे उपाध्यक्ष सुधीर नांदगावकर यांचा सत्कार होणार आहे. या महोत्सवाविषयी...

सांगली -  भारतीय चित्रपटसृष्टीची जागतिक स्तरावर पताका फडकवणारे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा महोत्सव येत्या १९ व २० जानेवारीला सांगलीत होत आहे. सांगली फिल्म सोसायटीच्यावतीने होणाऱ्या या महोत्सवाच्या निमित्ताने फेडेरेशन ऑफ फिल्म सोसायटीचे उपाध्यक्ष सुधीर नांदगावकर यांचा सत्कार होणार आहे. या महोत्सवाविषयी...

सुधीर नांदगावकर यांची ‘सत्यजित राय यांनी चित्रपटात केलेली क्रांती’, ‘सत्यजित राय यांची मध्यामंताराची  जाण’ आणि ‘सत्यजित राय यांनी घेतलेल्या, बदलत्या जीवनमूल्यांचा वेध’ अशी तीन अभ्यासपूर्ण व्याख्याने आणि सोबतच राय यांच्या जगप्रसिद्ध पाथेर पांचाली, अपराजितो, अपूर संसार, चारुलता, जलासाघर आणि जन आरण्य अशा चित्रपटांचा आस्वाद अशी अभूतपूर्व मेजवाणी रसिकांना अनुभवता येणार आहे.

राय यांच्या निवडक चित्रपटांच्या माध्यमातून आणि नांदगावकर  यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून, रसिकांना  सत्यजित राय यांची चित्रभाषा समजून घेता येणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम हा महाराष्ट्रातील एकमेव असेल.

१९ ते २० जानेवारी दरम्यान दुपारी दोन ते रात्री नऊ या कालावधीत हा महोत्सव होईल. वालचंद महाविद्यालयाच्या टिळक हॉलमध्ये हा महोत्सव असेल चित्रपटादरम्यान चहा आणि नास्ता अशी सोय केली  आहे. हा महोत्सव पूर्णपणे मोफत आहे. सोसायटीच्या सभासदांनी त्याचा लाभ घ्यावा. सभासद  नसलेल्यांनी नाव नोंदणी करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satyajeet Ray Film Festival in Sangli From 19 January