पावरपॅक 'सत्यमेव जयते'चा ट्रेलर रिलिज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

जॉन आणि मनोज वाजपेयी यांची जुगलबंदी सिनेमात बघायला मिळणार आहे.

अभिनेता जॉन अब्राहम सध्या फारच निवडक सिनेमे करत आहे. आगामी काळात त्याचा 'सत्यमेव जयते' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 15 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे.

ट्रेलर मध्ये दाखविल्याप्रमाणे, जॉन एका पोलिस अधिकाऱ्याच्या भुमिकेत आहे. पोलिस विभागातून होत असलेला भ्रष्टाचारा विरोधात तो लढतो. तर मनोज वाजपेयी देखील सिनेमात पोलिस अधिकाऱ्याच्याच भुमिकेत आहे. जॉन आणि मनोज वाजपेयी यांची जुगलबंदी सिनेमात बघायला मिळणार आहे. हा जुगलबंदी थ्रिलर आणि अॅक्शनपॅक असणार आहे. सिनेमात अभिनेत्री आयशा शर्मा ही मुख्य भुमिकेत आहे. 

15 ऑगस्टला मिलाप मिलन झवेरी दिग्दर्शित 'सत्यमेव जयते'ची टक्कर याच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या 'गोल्ड' आणि 'यमला पगला दिवाना फिर से' या सिनेमांशी होईल. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satyamev Jayate Trailer Out