Saubhagyavati Bhava 2: सौभाग्यवती भव 2 च्या चालू शुटींगमध्ये बिबट्याने सेटवर घातला हैदोस, फिल्मसिटीमध्ये भयावह वातावरण

सौभाग्यवती 2 च्या सेटवर बिबट्या घुसल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Leopard enters the sets of Saubhagyavati Bhava 2 in the late evening
Leopard enters the sets of Saubhagyavati Bhava 2 in the late eveningSAKAL
Updated on

सध्या फिल्मसिटीमध्ये बिबट्यांचा मोकाट वावर असलेला दिसुन येतोय. अनेक मराठी आणि आणि हिंदी मालिकांच्या सेटवर बिबट्या आढळल्याच्या घटना घडल्या आहेत.

अशातच फिल्मसिटीमध्ये पुन्हा एकदा बिबट्या शिरल्याची घटना घडलीय. सौभाग्यवती 2 च्या सेटवर बिबट्या घुसल्याची धक्कादायक घटना घडलीय.

(Saubhagyavati Bhava 2 Leopard enters the sets in the late evening)

Leopard enters the sets of Saubhagyavati Bhava 2 in the late evening
India VS Bharat 'भारत माता की जय' इंडीया नाव बदलण्याच्या वादात बिग बींची उडी

बिबट्या आल्याने सेटवर उडाला गोंधळ

करणवीर बोहरा आणि सृती झा यांची सर्वात लोकप्रिय मालिका 'सौभाग्यवती भव'चा दुसरा सीझन तयार होत आहे. त्याचे शूटिंगही सुरू झाले आहे. लवकरच त्याचे टीव्हीवर प्रसारणही होणार आहे. पण बिबट्या पहिल्याच दिवशी सेटवर दिसला. यानंतर सेटवर एकच गोंधळ उडाला.

4 सप्टेंबरच्या संध्याकाळी सेटवर शूटिंग सुरू असताना बिबट्याच्या आगमनाने सर्वांनाच धक्का बसला. यावेळी सेटवर काही क्रू मेंबर्स आणि कास्ट मेंबर्स उपस्थित होते. घाबरण्यासारखे काही नसले तरी, सर्वजण सुरक्षित आहेत. मात्र अशा घटना वारंवार घडत असल्याने लोक नक्कीच घाबरले आहेत.

फिल्मसिटीमध्ये बिबट्याची दहशत

काही दिवसांपुर्वी शोएब इब्राहिमच्या 'अजुनी' या मालिकेच्या सेटवर अशीच एक घटना घडली होती. येथे बिबट्या आला, त्यानंतर चार ते पाच दिवस शूटिंग थांबवण्यात आले. येथे त्याने एका कुत्र्यावरही हल्ला करून त्याला खाल्ल्याचे सांगण्यात आले.

अभिनेत्याने आपल्या व्लॉगमध्ये याचा खुलासा केला आहे. यापूर्वी मराठी टीव्ही मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं च्या सेटवरही बिबट्या घुसला होता. इतकेच नाही तर 'गुम है किसी के प्यार में'च्या सेटवर अजगर दिसला आणि 'नागिन 6'च्या सेटवर एक साप दिसला.

Leopard enters the sets of Saubhagyavati Bhava 2 in the late evening
OMG 2 नंतर अक्षय कुमारच्या या गाजलेल्या सिनेमाचा सिक्वेल येणार? अनुपम खेरने केला इशारा

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने घेतली दखल

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे प्रमुख सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी या प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन केले. कारण काही दिवसांत अनेक वेळा ही घटना घडली आहे.

असे क्रूर प्राणी सेटवर खुलेआम फिरत असतात तेव्हा, त्यावेळी सेटवर २०० हून अधिक लोक उपस्थित असतात, असेही त्यांनी सांगितले होते.

ही बाब सरकार गांभीर्याने घेत नसल्याचं सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी सांगितले. बिबट्या खुल्लेआम वावरत असल्याने लोकांचा जीव पुन्हा एकदा धोक्यात आला आहे.

18 जुलैलाही मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये मराठमोळी बालकलाकार मायरा वैकुळची हिंदी मालिका नीरजा च्या सेटवर आणि आणखी एका हिंदी मालिकेच्या सेटवर बिबट्या फिरताना दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com