दीपेश भानच्या मृत्यूने अभिनेत्री भावूक...पत्नीची अन् मुलाची घेणार काळजी | Saumya Tandon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saumya Tandon Post On Dipesh Bhan

दीपेश भानच्या मृत्यूने अभिनेत्री भावूक...पत्नीची अन् मुलाची घेणार काळजी

प्रत्येक मनोरंजन क्षेत्राला दीपेश भानच्या (Dipesh Bhan) मृत्यूने धक्का बसला आहे. दीपेश हा 'भाभीजी घर पर है' या (Bhabiji Ghar Par Hai) मालिकेत मलखनची भूमिका करत होता. त्याचे अनेक मित्र आणि मालिकेतील कलाकार त्याच्या अंत्यविधीला उपस्थित होते. दीपेशचा शनिवारी सकाळी वयाच्या ४१ वर्षी मृत्यू झाला. आता कलाकाराने जगाचा निरोप घेतला. सौम्या टंडन (Saumya Tandon) मालिकेतील माजी फेअर मेमने (अनिता) मलखनबरोबरचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Saumya Tandon Get Emotional After Remembering Malkhan Known Dipesh Bhan)

हेही वाचा: Screw Dheela : टायगर वेगळ्या भूमिकेत, 'स्क्रू ढिला'चा टिझर प्रदर्शित

त्यातून सौम्याने दीपेशच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सौम्याने पोस्टमध्ये खूप लिहिले. तिने त्यात मलखनबरोबरील आनंदाच्या क्षणांची आठवण केली.सौम्या कॅप्शनमध्ये लिहिते, हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल तुमचे आभार ! आम्ही खूप काही गंमतीशीर गोष्टी केल्या. व्हिडिओ बनवताना दीपेशबरोबर अनेकदा हास्यविनोद झाले. मात्र कधीही असे वाटले नव्हते की आयुष्यात असे काही घडेल. मी स्वतःला भाग्यवान समजते की मी मोठ्या प्रमाणावर वेळ अशा वेगळ्या व्यक्तीबरोबर व्यतीत केला. मी एवढेच म्हणेल की तुम्ही सुद्धा सर्वांना चांगली वागणूक द्या. मग तो तुमचा सहकलाकार असेल किंवा कोणीही असेल. हे आयुष्य खूप अल्प आहे. आनंदाचे क्षण तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर व्यतीत करा. कोणालाही माहीत नाही की येणाऱ्या काळात काय घडेल? (Entertainment News)

हेही वाचा: आयकर विभागाकडून अक्षय कुमारचा सन्मान, सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला

पुढे सौम्या म्हणते दीपेशला शब्द देते, दीपेश तुझ्याबरोबर जो काही वेळ घालवला तो नेहमी माझ्याबरोबर राहील. काका आणि काकूला नमस्कार सांगा. एक दिवशी आपण या जगात नक्कीच भेटू, तोपर्यंत हसत राहा. मी माझ्या परीने तुझी पत्नी आणि मुलाची काळजी घेईल.

Web Title: Saumya Tandon Get Emotional After Remembering Malkhan Known Dipesh Bhan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top