esakal | 'भाभीजी घर पर है' मधील अनीता भाभीने सोडली मालिका, 'ही' अभिनेत्री घेऊ शकते सौम्याची जागा
sakal

बोलून बातमी शोधा

bhabiji ghar par hai

अनीता भाभीची भूमिका साकारणा-या अभिनेत्री सौम्या टंडनने या मालिकेला रामराम ठोकलाय. हा शो सोडण्यामागचं काय आहे कारण आणि कोणती अभिनेत्री आता नवीन अनीता भाभी म्हणून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे? वाचा

'भाभीजी घर पर है' मधील अनीता भाभीने सोडली मालिका, 'ही' अभिनेत्री घेऊ शकते सौम्याची जागा

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- 'भाभीजी घर पर है' या टीव्ही मालिकेतील गोरी मॅम म्हणजेच अनीता भाभी आता हा शो सोडत असल्याने मालिकेवर 'भाभीजी घर पर नही है' असं म्हणायची वेळ आलीये. अनीता भाभीची भूमिका साकारणा-या अभिनेत्री सौम्या टंडनने या मालिकेला रामराम ठोकलाय. हा शो सोडण्यामागचं काय आहे कारण आणि कोणती अभिनेत्री आता नवीन अनीता भाभी म्हणून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे? वाचा

हे ही वाचा:  इरफानला कॅन्सर झाल्यावर सगळ्यात पहिले केली होती संजय दत्तने मदत

एका मुलाखती दरम्यान अनीता भाभीची भूमिका साकारणा-या सौम्या टंडनने सांगितलं की ती आता २१ ऑगस्टला संपणा-या तिच्या या शोचं कॉन्ट्रॅक्ट वाढवणार नाहीये. म्हणजेच शुक्रवारी तिच्या शूटींगचा शेवटचा दिवस असणारे. सोम्याने स्वतः याबद्दल माहिती दिल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून ती हा शो सोडणार असल्याच्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सोम्याच्या करिअरसाठी हा शो आत्तापर्यंतचा सगळ्यात यशस्वी शो ठरला आहे. या पात्रामुळे सौम्या देशातील घरा घरांत पोहोचली आहे. 

तीने तिच्या या निर्णयाबाबत सांगताना स्पष्ट केलं आहे की 'खरं तर सध्या देशातील परिस्थिती पाहता एक नोकरी किंवा लोकप्रिय मालिका सोडण्याचा निर्णय न पचण्यासारखाच असेल. मात्र मला वाटतं की नियमित रुपाने कमाई करणं यामध्ये जास्त उत्साह राहत नाही. मला आता अशा काही प्रोजेक्ट्सवर काम करायचं आहे जे माझ्यातील कलाकाराला आणखी वेगळ्या स्तरावर नेतील.'

'मी असं नाही म्हणत की या शोमुळे माझी प्रगती झाली नाही. माझा इथला आत्तापर्यंतचा प्रवास खूप सुंदर राहिला आहे. हे पात्र मी जवळपास ५ वर्ष साकारत आहे. मात्र मला नाही वाटत की या शोसाठी मी माझी आणखी ५ वर्ष द्यावी. मला या टीमची खूप आठवण येईल मात्र कंफर्ट झोनमधून बाहेर पडून रिस्क घ्यायला हवी.'   

या शोमध्ये अभिनेत्री सौम्या टंडनची जागा बिग बॉस १३ फेम आणि काटा लगा गर्ल शेफाली जरिवाला घेणार असल्याची चर्चा आहे. 

saumya tandon quits bhabi ji ghar par hain said it was not an impulsive decision  

loading image
go to top