esakal | 'सावधान इंडिया' फेम सुशांत सिंहचं ट्विटर अकाऊंट बंद; मोदींवर साधला निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

'सावधान इंडिया' फेम सुशांत सिंहचं ट्विटर अकाऊंट बंद; मोदींवर साधला निशाणा

'सावधान इंडिया' फेम सुशांत सिंहचं ट्विटर अकाऊंट बंद; मोदींवर साधला निशाणा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

प्रसिद्ध अभिनेता आणि 'सावधान इंडिया' Savdhaan India या मालिकेचा सूत्रसंचालक सुशांत सिंह Sushant Singh याचा ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद करण्यात आला होता. अचानक ट्विटर अकाऊंटवर बंद झाल्याने सुशांतने त्याचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद मोदींवर PM Narendra Modi संताप व्यक्त केला. 'पुन्हा एकदा पुरस्काराने सन्मानित, मी योग्य मार्गावर आहे हे दाखवून देण्यासाठी धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी', अशी उपरोधिक टीका त्याने केली. सुशांतने ट्विटरवर संताप व्यक्त करत लिहिलं, 'पुन्हा एकदा माझं ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आलं आहे. किमान पूर्वसूचना देण्याची तरी शालीनता बाळगा', अशा शब्दांत त्याने ट्विटरला सुनावलं. (Savdhaan India Anchor Sushant Singh Twitter Account Withheld For Few Hours)

सुशांतचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्याविरोधात आवाज उठवला. स्वरा भास्कर, गुलशन देवैय्या यांसारख्या सेलिब्रिटींनी ट्विटर अकाऊंट बंद केल्याचा निषेध व्यक्त केला. मात्र काही काळानंतर त्यांचं अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आलं.

हेही वाचा: अरुणाचलच्या आमदाराला 'चिनी' म्हणणाऱ्याचा वरुण, राजकुमारने घेतला समाचार

याआधीही सुशांत यांचा ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यात त्यांचा अकाऊंट ब्लॉक केला होता. सुशांत हे सातत्याने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि सरकारच्या विरोधात पोस्ट लिहित असल्याने ही कारवाई झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू झाल्यानंतरही त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आपली भूमिका कायम ठेवली.