esakal | जवळचे पैसे संपले, अभिनेत्री सविता बजाज आयसीयुमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

actress savita bajaj

जवळचे पैसे संपले, अभिनेत्री सविता बजाज आयसीयुमध्ये

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - नदिया के पार फेम अभिनेत्री सविता बजाज (savita bajaj) हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. त्यांना आर्थिक संकटाला सामोर जावं लागलं आहे. यामुळे त्या सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. त्यावर कित्येक सेलिब्रेटींनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आता सविता बजाज यांना उपचारासाठी आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे. आपल्या आजारपणामुळे त्यांना वेगवेगळ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पैशांची जाणवणारी तंगी, त्याचा प्रकृतीवर झालेला परिणाम यामुळे सविता बजाज वेगळ्या परिस्थितीतून जात आहेत. (savita bajaj in icu not get palce in old age home due to financial issues yst88)

कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्राला मोठ्या वेगळ्या स्थितीतून जावं लागत आहे. त्याचा परिणाम अनेक सेलिब्रेटींवर झाला आहे. यापूर्वी अनेक कलाकारांनी त्याच्यावरुन सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे. कोरोनामुळे दोन वर्षांपासून हाताला काम नसलेल्या सेलिब्रेटींची संख्या वाढते आहे. अशावेळी पैसा कुठून उभा करायचा असा प्रश्न त्या सेलिब्रेटींना भेडसावत आहेत. सविता बजाज त्यापैकी एक आहेत. त्यांच्याच एका पोस्टला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

सविता बजाज या रुग्णालयात दाखल आहेत अशी माहिती अभिनेत्री नुपूर अलंकार हिनं सविता बजाज यांच्याबद्लची अधिक माहिती दिली आहे. सविता यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होताना दिसते आहे. अजूनही त्या आयसीयुमध्ये दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. नुपूरनं सांगितलं की, सविता बजाज यांना श्वासोश्वास घेण्यास अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

हेही वाचा: #MeToo: वडिल अनुराग कश्यप यांच्यावरील आरोपावर आलियाची प्रतिक्रिया

loading image