Savitribai Phule : आता केतकी चितळे सावित्रीबाई फुलेंवरही बोलली..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai Phule

Savitribai Phule : आता केतकी चितळे सावित्रीबाई फुलेंवरही बोलली..!

Ketaki Chitale Viral Video : अभिनेत्री केतकी चितळे अभिनयापेक्षा कायम आक्षेपार्ह पोस्टमुळे सतत चर्चेत असते. तरीही तिचा सोशल मीडियावरचा वावर सगळ्यांच लक्ष वेधून घेतो. पण सध्या तिची पोस्ट वेगळ्याच कारणासाठी व्हायरल होत आहे.

यावेळी तिने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्या आपले प्रेरणास्थान असल्याची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात 'तयास मानव म्हणावे का...?' ही सावित्रीबाईंची कविता ऐकवली आहे. आणि या कवितेमुळे, सावित्रीबाईंच्या जीवनातून आपल्याला रोज प्रेरणा मिळते असं ती म्हणते.

हेही वाचा: Ketaki Chitale : केतकीच्या हातावरील टॅटूचं 'पवार कनेक्शन'? तो आकडा म्हणजे...

सावित्रीबाईंवर तर प्रत्यक्ष शेण फेकलं गेलं होतं, माझ्यावर तर फक्त शाब्दिक शेण फेकण्यात येत आहे. जर त्या सगळं सहन करत आपलं कार्य करत राहील्या तर मी पण उभं राहूच शकते, असं यात केतकी म्हणते.

शिवाय या कवितेवरून प्रेरणा घेत तिने स्वतः लिहीलेल्या चारओळी ऐकवत पुन्हा 'तयास मानव म्हणावे का?' असा प्रश्न विचारते.