सावनी रविंद्रने पतीला दिलं ‘सुरेल’ सरप्राइज !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

गायिका सावनी रविंद्रचं नुकतंच लग्न झालं आहे. सावनीच्या लग्नानंतर तिचं पहिलं रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे. जे सावनीने आपल्या पतीला लग्नानंतर दिलेलं सरप्राइज गिफ्ट आहे.

या आगळ्या सरप्राइज गिफ्ट विषयी नववधू सावनी सांगते, ”मला आशिषला वेडिंग गिफ्ट देण्याची इच्छा होती. काय गिफ्ट करावं याचा विचार करताना माझ्या असं लक्षात आलं, की माझे सूर हेच माझं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मी त्याला एक सुरेल सरप्राइज द्यायचं ठरवलं.”

ती पुढे सांगते, “जूनी गाणी गाण्यापेक्षा त्याच्यासाठीच एक गाणं तयार करायचं मी नक्की केलं. आणि मग माझ्या भावाला वैभव जोशी, मित्र सागर धोते, मयुर धांधेला यात सहभागी केलं. वैभव जोशीने लिहीलेल्या गीताला सागर धोतेने संगीतबध्द केलंय. तर मयुरने गाण्यात माझ्या पतीचं आशिषचं पेंटिंग बनवलंय.”

“मी आमच्या लग्नाच्या ‘संगीत’च्या कार्यक्रमाला हे सरप्राइज आशिषला दिलं. माझ्या ह्या रोमँटिक सरप्राइजनंतर त्याच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले होते. आणि आता मी तेच माहिया गाणं ऑफिशिअली लाँच केलंय. जसं आशिषला गाणं आवडलं तसंच ते सर्व प्रेक्षकांनाही आवडेल, असा मला विश्वास वाटतो.”  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sawani rawindra surprises her husband by song