esakal | स्कॅम 1992 फेम प्रतिक गांधीच्या पत्नीचे आयुष्य खडतर; सांगितला अनुभव
sakal

बोलून बातमी शोधा

scam 1992 actor prateek gandhi wife bhamini oza gandhi survive.jpg

प्रतिकची पत्नी भामिनी देखील अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

स्कॅम 1992 फेम प्रतिक गांधीच्या पत्नीचे आयुष्य खडतर; सांगितला अनुभव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्कॅम 1992 या वेब सिरीजमधील अभिनयामुळे प्रचंड लोकप्रियता मिळालेला कलाकार म्हणजे प्रतिक गांधी. त्याच्या या वेब सिरीजने त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. प्रतिकच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती खूप कमी प्रेक्षकांना माहित आहे. त्याचे आणि त्याची पत्नी भामिनी गांधीचे आयुष्य हे खूप संघर्षमय आहे. प्रतिकची पत्नी भामिनी देखील अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. 'साराभाई VSसाराभाई', 'खिचडी' या प्रसिध्द मालिकेमध्ये भामिनी गांधी हीने काम केले आहे. हिंदी बरोबरच गुजराती मालिकांमध्ये देखील भामिनीने काम केले आहे. 

पंधरा सिनेमे, सलमानच्या रोलचं नाव 'प्रेम'; वाचा काय आहे कारण!

'न बोले तुम न मैंने कुछ कहा' या प्रसिध्द मालिकेमध्ये भामिनीने काम केले आहे. भामिनीला 2012-13 मध्ये ब्रेन ट्यूमर हा आजार झाला होता. एका मुलाखतीमध्ये तिने या आजाराबाबत माहिती दिली होती. मुलाखतीत भामिनीने सांगितले, 'मी देवाचे आणि माझ्या सर्जनचे आभार मानते. माझ्या सर्जनने मला ट्युमरबाबत वेळीच सांगितले. ट्युमर सर्जरीच्या वेळेस माझ्या चेहऱ्यांच्या नसांवर परिणाम होणार होता. त्यामुळे माझा चेहरा बिघडू शकला असता. '

भामिनीने प्रतिकसोबत 2009 मध्ये लग्न केले. दोघे एकमेकांचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडीयावर शेअर करतात. भागिनी आणि प्रतिकाला 2014 मध्ये एक गोंडस मुलगी झाली. तिचे नाव त्याने मिराया असे ठेवले आहे.