esakal | रिस्क है तो ईश्क है': स्कॅम 1992 मधील अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत
sakal

बोलून बातमी शोधा

actress barot marry

अंजली नुकतीच गौरव अरोरासोबत विवाह बंधनात अडकली आहे. काही दिवसांपूर्वी तिने मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले होते.

रिस्क है तो ईश्क है': स्कॅम 1992 मधील अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - सध्या चित्रपटांपेक्षा जास्त बेव सिरीजला लोकप्रियता मिळत आहे. अशीच एक लोकप्रिय आणि सुपर हिट असलेली वेब सिरीज म्हणजे 'स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी'. या वेब सिरीजच्या कथानकामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे ही वेब सिरीज खुप गाजली.

बसिरीजमधील रिस्क है तो ईश्क है हा डायलॉग खूप गाजला. हा डायलॉग अंजली बरोत या अभिनेत्रीच्या तोंडी आहे. अंजलीने या वेब सिरीजमध्ये हर्षद मेहताची पत्नी ज्योती मेहताची भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. 

अंजली नुकतीच गौरव अरोरासोबत विवाह बंधनात अडकली आहे. काही दिवसांपूर्वी तिने मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले होते. १६ फेब्रुवारीला अंजलीने रिस्क है तो ईश्क है लिहिलेला टी शर्ट घालून फोटो पोस्ट केले होते.

हे वाचा - बाळाचं नाव रवीच का? अनिताने सांगितलं कारण

गौरव आणि अंजलीच्या लग्नात श्रेया धन्वंतरीने हजेरी लावली होती. श्रेया ही अंजलीची स्कॅम 1992 वेब सिरीजमधील सहकलाकार आहे. श्रेयाने या वेब सिरीजमध्ये पत्रकार सुचिता दलालची भूमिका केली होती. तिच्या सोबत या वेब सिरीजमधील अभिनेते जेमिनी पाठक हे देखील या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.

नवविवाहीत जोडप्याचे लग्नातील व्हिडीओ श्रेयाने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. या व्हिडीओमध्ये अंजली आणि गौरव यांची लग्न मंडपात 'बल्ले बल्ले जी सोनियादे रंग' या गाण्यावर एन्ट्री होताना दिसत आहे. यावेळी अंजलीने लाल रंगाचा लेहंगा घातला होता आणि गौरवने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती.