esakal | ‘ब्लॅक विडो’ तिस-यांदा बोहल्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Scarlett Johansson gets married to Colin Jost

स्कारलेटने विवाहबध्द होताना त्याची बातमी कुणाला कळणार नाही याची काळजी घेतली होती. ‘ब्लॅक विडो’ फेम अभिनेत्री स्कारलेट जोहानसनने तिसरं लग्न केलं.

‘ब्लॅक विडो’ तिस-यांदा बोहल्यावर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - ल्युसी, ब्लॅक विडो या भूमिका साकारुन जगप्रसिध्द झालेल्या स्कारलेटने मोठी गुप्तता पाळुन लग्न केलं आहे. ती तिस-यांदा बोहल्यावर चढली आहे. तिने अमेरिकन कॉमेडियन कॉलिन जोस्टशी नवा संसार सुरु केला आहे.

स्कारलेटने विवाहबध्द होताना त्याची बातमी कुणाला कळणार नाही याची काळजी घेतली होती. ‘ब्लॅक विडो’ फेम अभिनेत्री स्कारलेट जोहानसनने तिसरं लग्न केलं. अमेरिकन कॉमेडियन कॉलिन जोस्टशी ती गुपचूप विवाहबद्ध झाली. स्कारलेटने या लग्नाची कोणतीच घोषणा केली नव्हती. गेल्या आठवड्यातच तिने खासगी समारंभात लग्न केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 2017 पासून स्कारलेट कॉलिनला डेट करत आहे.  Meals on Wheels च्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर स्कारलेटच्या लग्नाविषयीची माहिती देण्यात आली आहे. स्कारलेटवर चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

2008  मध्ये स्कारलेटने रायन रेनॉल्ड्सशी लग्न केलं होतं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर 2011 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2014 मध्ये तिने रोमेन डॉरिअॅकशी लग्न केलं. हे लग्नसुद्धा केवळ तीन वर्षे टिकलं. 2017 मध्ये स्कारलेटने घटस्फोट दिला. स्कारलेट आणि रोमेनला एक मुलगी असून रोझ असं तिचं नाव आहे. स्कारलेट आता 34 वर्षांची असून कॉलिन 38 वर्षांचा आहे. कॉलिनचं हे पहिलंच लग्न आहे.