Sushant Singh Rajput: सुशांतच्या नावात दडलंय एक अनोखं रहस्य, तुम्हाला माहीतीये का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sushant singh rajput, happy birthday sushant

Sushant Singh Rajput: सुशांतच्या नावात दडलंय एक अनोखं रहस्य, तुम्हाला माहीतीये का?

आज सुशांत सिंग राजपूतचा वाढदिवस. सुशांत आज आपल्यात नाही ही गोष्ट आजही मनाला दुःख देते. सुशांतने त्याच्या कारकीर्दीत अनेक सिनेमे गाजवले. हे सिनेमे सुशांतच्या दमदार अभिनयाची जाणिव करून देतात. सुशांतच्या नावाचं एक खास रहस्य आहे.

सुशांत सिंग राजपूतचं फॅन फॉलोइंग खूप आहे. सुशांत सुध्दा त्याच्या फॅन्सचा आदर करायचा. फॅन्स सुद्धा सुशांतवर भरभरून प्रेम करायचे. एका फॅनने सुशांतला त्याच्या नावाबद्दल विचारले होते. तेव्हा सुशांतने त्याच्या नावामागे किती गोड रहस्य दडलं आहे याचा उलगडा केला.

हेही वाचा: Sushant Singh Rajput : सुशांतच्या फ्लॅटला अडीच वर्षांनी मिळाला भाडेकरु, त्या फ्लॅटमध्ये अजुनही...

सुशांतचा जेव्हा छीछोरे सिनेमे आलेला. त्यावेळी हा किस्सा घडलेला. "सुशांत तुझ्या नावाचा अर्थ काय?" असा प्रश्न एका फॅनने सुशांतला विचारला. तेव्हा सुशांतने दिलेल्या उत्तराने सर्वांचं मन जिंकलं.

सुशांत उत्तर देताना म्हणालेला. "सर्व एकाच वेळी सर्वकाही. आणि विशेष गोष्ट माझ्या नावाचा जो मधला भाग आहे त्यात माझ्या आईचं नाव लपलंय. उषा. आहे की नाही गंमत?"

अशा प्रकारे Sushant च्या नावात त्याच्या आईच नाव लपलं आहे. सुशांतचं त्याच्या आईसोबत खास नातं होतं. सुशांतची इंस्टाग्रामवरची शेवटची पोस्ट सुद्धा त्याच्या आईविषयी होती.

विशेष गोष्ट म्हणजे सुशांतचे फॅन्स त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी पासूनच इंस्टाग्रामवर कमेंटच्या माध्यमातून त्याला हॅपी बर्थडे म्हणत आहेत.

हेही वाचा: Sushant Singh Rajput: निधनापूर्वी इतका अस्वस्थ होता सुशांत?, 2 वर्षांनी समोर आला व्हिडीओ

दिल बेचारा हा सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमा ठरला. सुशांतला आदरांजली म्हणून हा सिनेमा हॉटस्टार वर फ्री मध्ये दाखवण्यात आला होता. सुशांत एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी सिनेमात साकारलेली महेंद्र सिंग धोनीची भूमिका अजरामर ठरली. याशिवाय काय पो चे, ब्योमकेश बक्षी, पिके, केदारनाथ, सोनचिरिया, शुध्द देसी रोमान्स, राबता अशा हिंदी सिनेमांमध्ये काम केलंय.

आज सुशांत आपल्यात नसला. तरी त्याच्या दर्जेदार सिनेमांमधील त्याच्या भूमिकांमधून तो कायम आपल्यासोबत असेलच.