Seema Sajdeh: पुन्हा 'बॉलीवूड वाईफ' बनणं नामंजूर!|Seema Sajdeh No More A Bollywood Wife’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Seema Sajdeh news

Seema Sajdeh: पुन्हा 'बॉलीवूड वाईफ' बनणं नामंजूर!

Bollywood Celebrity News: सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा सचदेव यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. सीमानं यापूर्वीच आपण काही झालं तरी सोहेलसोबत राहणार नसल्याचे सांगून चाहत्यांना धक्का दिला होता. (Sohail Khan - Seema Sajdeh) अरबाजनंतर खान कुटूंबियांसाठी ही मोठी बातमी मानली जातेय. करण जोहर निर्मित फॅब्युलस लाईव्ह्ज ऑफ बॉलीवूड नावाची मालिका ओटीटीवर रिलिज झाली आहे. त्याचा दुसरा सीझ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यातच सीमा आणि सोहेल खानच्या घटस्फोटाची बातमी मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या त्या मालिकेमध्ये सीमा सचदेह, महिप कपूर, (Bollywood News) निलम कोठारी आणि भावना पांडे या सहभागी झाल्या आहेत. या मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. गेल्या काहि दिवसांपासून सीमा आणि सोहेलच्या घटस्फोटाची चर्चा या मालिकेच्या निमित्तानं होत असल्याचे दिसून आले आहे. मालिकेच्या एका प्रसंगात सीमा तिच्या घराचे नाव बदलून सीमा सचदेह असे करते. जे पूर्वी सीमा खान असे होते. त्यावरुन नेटकऱ्यांनी अंदाज लावला आहे की, त्यांच्यात काही आलबेल नाही.

हेही वाचा: दुष्ट विचारांचा व्हायरस किल करणारा श्रीगणेश

एका मुलाखतीमध्ये सीमानं मोठं वक्तव्य केलं आहे. जे त्यांच्या कौटूंबिक नात्यावर आहे. सीमा म्हणते, गेल्या काही वर्षांपासून त्या घरामध्ये माझी घुसमट होत होती. जी आता मला थांबवायची आहे. त्यामुळे सोहेलसोबत घटस्फोटाचा निर्णय घेत आहे. यापुढे बॉलीवूड वाईफ बनण्यात आपल्याला कोणताही रस नसल्याचे सीमानं म्हटलं आहे. मला एक गोष्ट कळत नाही ती म्हणजे, पतीच्या नावावरुनच पत्नीला का ओळखले जावे, तिला स्वताची काही ओळख आहे की नाही, आपल्याकडे नेहमीच पितृसत्ताक दृष्टीनं साऱ्या गोष्टी पाहिल्या जातात.

हेही वाचा: धबधब्यांखाली मनसोक्त भिजायचंय...मग ही आहेत ठिकाणं....

मला कोण काय म्हणतं याचा काहीही फरक पडत नाही. माझ्यावर त्या गोष्टींचा किती परिणाम होणार आहे हे मला जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे लोकांनी आमच्या नात्यावर काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना काही सगळ्या गोष्टी माहिती नाही. आम्हाला त्यांना ते सांगायचेही नाही. स्वताला व्यक्त करताना ज्या संघर्षातून जावे लागले ते मांडण्याचा आपण प्रयत्न केल्याचे सीमानं म्हटले आहे.

Web Title: Seema Sajdeh No More A Bollywood Wife After Divorce With Sohail Khan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..