वास्तव फेम ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil Shende

वास्तव फेम ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन

मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं रात्री उशिरा निधन झालं. केवळ मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या. सरफरोश, गांधी, वास्तव अशा अनेक हिंदी चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका लोकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.

सुनील शेंडे यांचं रात्री १ वाजता विले पार्ले पूर्व इथल्या राहत्या घरी निधन झालं.आज दुपारी त्यांचे अंत्यविधी होणार आहेत. मुंबईतल्या पारशीवाडा इथल्या हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुलं ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.