
Shaakuntalam: समंथाचा पहिला लूक आऊट
समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) प्रेम गाथा 'शाकुंतलम' मधील फर्स्ट लूक आज रिलीज झाला.
समंथा, जिने पूर्वी सांगितले होते की तिला पौराणिक कथा, कालखंडातील नाटके आणि राजे आणि राण्यांच्या जगाचे नेहमीच वेड आहे, ती आता गुण सेखरच्या दिग्दर्शनात ती राणी शकुंतला देवीची (Guna Sekhaar) भूमिका करत आहे. (Shaakuntalam movie release)
'शाकुंतलम' ही शकुंतला आणि दुष्यंत यांच्या महाकाव्य प्रेमकथेवर आधारित आहे, जे महाभारतातील 'आदी पर्वा' चे रूपांतर आहे. देव मोहन 'शाकुंतलम' मध्ये राजा दुष्यंताच्या भूमिकेत आहे, तर अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अर्हा (Allu Arjun's Daughter Allu Arha) ही राजकुमार भरतच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता कबीर दुहान सिंग (Kabir Duhan Singh) आगामी महाकाव्य नाटकात राजा असुराच्या भूमिकेत दिसणार आहे.

Samantha Ruth Prabhu
नीलिमा गुणा (Neelima Guna) निर्मित, पौराणिक चित्रपटात VFX टेक्नोलॉजी आहे. निर्माते पोस्ट-प्रॉडक्शन औपचारिकता लवकरच पूर्ण करण्यास उत्सुक आहेत. 'शाकुंतलम' हा समंथाचा पहिला पौराणिक चित्रपट आहे. 'शाकुंतलम'साठी सेखर व्ही जोसेफ हे सिनेमॅटोग्राफर आहेत, तर प्रवीण पुडी हे संपादन सांभाळत आहेत. मणि शर्मा साउंडट्रॅक आणि बॅकग्राउंड स्कोअर तयार करणार आहेत. चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Web Title: Shaakuntalam Poster Out Today Samanathas Look
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..