'जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीमुळेच मी..', अनेक वर्षांनी शबाना आझमी अखेर बोलल्याच..Shabana Azmi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shabana Azmi, Javed Akhtar, Honey Irani

Shabana Azmi: 'जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीमुळेच मी..', अनेक वर्षांनी शबाना आझमी अखेर बोलल्याच..

Shabana Azmi: बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांनी झोया अख्तर आणि फरहान अख्तर यांच्याशी असलेल्या आपल्या नातेसंबंधाविषयी खुलासा केला आहे. त्यांनी त्या मैत्रीपूर्ण संबंधाविषयी मोकळेपणानं भाष्य केलं आहे.

फरहान आणि झोया अख्तर हे दोघे गीतकार-लेखक जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीची मुलं आहेत. त्यांच्याविषयी बोलताना शबाना आझमी यांनी नुकतंच खुलासा करत म्हटलं आहे की,''झोया आणि फरहान सोबतच्या माझ्या नात्यासाठी मी जावेद अख्तर यांची पहिली पत्नी हनी ईराणी हिची ऋणी आहे''.

शबाना यांनी असं देखील सांगितलं की हनी ईराणी माझ्या कोणत्याच गोष्टीत उगाच ढवळाढवळ करत नाही. (Shabana Azmi on equation with kids zoya and farhan akhtar say,its all because of javed akhtar's first wife honey irani)

Shabana Azmi on equation with kids zoya and farhan akhtar

Shabana Azmi on equation with kids zoya and farhan akhtar

जावेद अख्तर यांचे लग्न लेखिका हनी ईराणी यांच्यासोबत झालं होतं. त्यांना दोन मुलं आहे फरहान आणि झोया. १९७८ मध्ये हे दोघे विभक्त झाले. त्यानंतर जावेद अख्तर यांचे सूर शबाना आझमी यांच्याशी जुळले आणि त्यांनी १९८४ मध्ये लग्न केलं. मात्र असं असलं तरी हे सर्व एकमेकांशी चांगलं बॉन्ड शेअर करतात. एकमेकांच्या सुख-दुःखात सामिल असतात.

फरहान आणि झोया यांच्यासोबतच्या नात्याविषयी शबाना आझमी म्हणाल्या की,''आम्ही खूप फ्रेंडली आहोत. मैत्री आणि विश्वासामुळे आमच्यात खूप चांगले संबंध राहिले आहेत. मी फरहान आणि झोयाला खूप महत्त्व देते आणि मला वाटतं ते देखील माझा मान राखतात. मला वाटतं याच्यासाठी मी सगळं क्रेडिट त्यांच्या आईला देईन. जर तिनं मनात आणलं असतं तर तिनं तिच्या मुलांसोबत माझं नातं कधीच चांगलं होऊ दिलं नसतं''.

Shabana Azmi with Javed Akhtar

Shabana Azmi with Javed Akhtar

शबाना आझमी पुढे म्हणाल्या,''मी हे मनापासून मान्य करेन की मी हनीची यासाठी खूप आभारी आहे. माझं केवळं तिच्या मुलांसोबत नाही तर तिच्याशी देखील खूप छान नातं आहे. खूप चांगलं बॉन्ड आम्ही शेअर करतो. ती माझ्या कामात कधीच नाक खुपसत नाही. जर एखाद्या गोष्टीविषयी तिला बोलायचं नाही असं मला कळालं तर मी देखील त्या गोष्टी करणं टाळते''.

या वर्षाच्या सुरुवातीला शबाना आझमी यांनी इन्स्टाग्रामवर एक फॅमिली फोटो शेअर केला होता. यामध्ये ती जावेद अख्तर,जोया अख्तर,फरहान अख्तर आणि त्याची पत्नी शिबानी दांडेकर यांच्यासोबत पोझ देताना दिसत होती. हनी ईरानी देखील या फोटोत दिसत आहेत. फोटो शेअर करत शबाना आझमी यांनी कॅप्शन दिलं होतं की,'आम्ही सगळे फॅमिली आहोत..'