उर्फीनं चोरली लहान मुलांची खेळणी.. नवा ड्रेस पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स Urfi Javed Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed Viral Video

Urfi Javed Viral Video: उर्फीनं चोरली लहान मुलांची खेळणी.. नवा ड्रेस पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Urfi Javed Viral Video: उर्फी जावेद नेहमीच आपल्या लूकसोबत वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. कधी ती सायकलच्या चैननं ड्रेस बनवते तर कधी मोबाईल फोनच्या सिम कार्डनं तर कधी आपल्या टॉपच्या जागी जिन्सच गळ्यात अडकवते. तिचा हा अतरंगी लूक नेहमीच चर्चेत असलेला पहायला मिळतो. (Urfi javed makes new outfit with littile teddy watch video)

आता उर्फी जावेद आपल्या नव्या आऊटफिटमध्ये समोर आली आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे,ज्यामध्ये तिचा एक नवा आऊटफिट नजरेस पडत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे आणि त्या ड्रेसवर तिनं एक फर्रचं जॅकेट घातलं आहे ज्यामुळे तिचा आऊटफिट चर्चेत आहे.

उर्फी जावेदचा नवीन ड्रेस यामुळे चर्चेत आहे कारण तिनं जे फर्रचं जॅकेट कॅरी केलं आहे ते मुलांच्या खेळण्यांमधील छोट्या बाहुल्यांनी बनवलं आहे. उर्फी जावेद,जी एकदम विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते, तिचा हा नवा प्रयोगशील लूक चाहत्यांना भलताच आवडला आहे. हा ड्रेस घातलेल्या उर्फीला पापाराझींनी स्पॉट केलं.तेव्हा उर्फी म्हणाली, 'उन्हाळा असो की हिवाळा फॅशन तर फॅशन असते..'.

उर्फीला अनेकदा लोक तिच्या विचित्र फॅशन स्टाईलमुळे ट्रोल करताना दिसतात,पण हा ड्रेस चाहत्यांना पसंत पडताना दिसत आहे.

अशोक शर्मा नावाच्या एका इन्स्टाग्राम नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'खूप छान दिसतेयस'. आणखी एकीनं लिहिलंय की,'खूपच छान आहे हा आऊटफिट'. तर कुणीतरी लिहिलंय,'पहिल्यांदा क्यूट दिसतेय उर्फी'.

तुम्हाला माहितीसाठी सांगतो की उर्फी जावेदनं कितीतरी टी.व्ही शोजमध्ये काम केलं आहे,पण लोकांमध्ये ती आपल्या फॅशन सेन्समुळे खूप प्रसिद्ध आहे. ती आजच्या काळात सोशल मीडिया सेन्सेशन आहे,जी नेहमीच काही ना काही विधानं किंवा हरकत करून खळबळ उडवून देते.