'इतका गर्व कसला?'; शाहरुख-आर्यन खानच्या व्हिडीओवर भडकले नेटकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shah rukh aaryan khan

'इतका गर्व कसला?'; शाहरुख-आर्यन खानच्या व्हिडीओवर भडकले नेटकरी

sakal_logo
By
स्वाती वेमूल

आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. अभिनेता शाहरुख खानचे Shah Rukh Khan फोटो, व्हिडीओ टिपण्यासाठी पापाराझींची धडपड सुरू असते. पापाराझींनी क्लिक केलेले त्याचे फोटो आणि व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होतात. शाहरुख आणि त्याचा मुलगा आर्यन खानचा Aryan Khan असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओमुळे या दोघांनाही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 'इतका गर्व कसला', असा सवाल नेटकऱ्यांनी या दोघांना केला आहे.

मुंबईतील वांद्रे याठिकाणी शाहरुख आणि आर्यन खानला पाहिलं गेलं. यावेळी शाहरुखने त्याचा चेहरा पूर्णपणे झाकला होता. पापाराझींपासून लपत तो कारमध्ये जाऊन बसला, त्यामुळे त्याच्यावर टीका करण्यात येत आहे. मात्र शाहरुख त्याच्या आगामी 'पठाण' या चित्रपटातील लूक लपवण्यासाठी असं करत असल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे आर्यन खानलाही वांद्र्यात पाहिलं गेलं. मात्र आर्यननेही पापाराझींना फोटो काढण्याची संधी दिली नाही. कारमधून बाहेर पडताच तो सरळ पुढे निघून गेला. या दोघांच्या अशा वागण्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.

हेही वाचा: गौरी खानच्या हातात 'ब्लॅक वॉटर'; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

हेही वाचा: 'अरे, कुठे नेऊन ठेवली ही मालिका'; 'अरुंधती'च्या वागण्यावर भडकले प्रेक्षक

याआधी शाहरुखची पत्नी गौरी खानचाही एक व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळी तिच्या हातात असलेल्या ब्लॅक वॉटर बॉटलला पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. शाहरुखच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, त्याने 'झिरो' या चित्रपटानंतर मोठा ब्रेक घेतला आहे. आता आगामी पठाण या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिका साकारणार आहे.

loading image
go to top