Pathaan: शाहरुख तर नावालाचं! 'पठाण'चे खरे हिरो तर हे... अखेर फोटो समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan Movie

Pathaan: शाहरुख तर नावालाचं! 'पठाण'चे खरे हिरो तर हे... अखेर फोटो समोर

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या पठाण या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच आहे. आता हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने एकाहून एक स्टंट आणि अॅक्शन सीक्वेन्स केले आहेत.

पण सिनेमात ॲक्शन सीन करताना दिसत असलेले शाहरुख – दीपिका नसून इतर कलाकार आहेत. ज्याचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

हा फोटो शाहरुख खानच्या फॅन क्लब पेजवर शेअर करण्यात आला आहे. किंग खान आणि दीपिका पदुकोण बॉडी डबल्ससोबत दिसत आहेत. फोटोमध्ये पठाण चित्रपटात दमदार ॲक्शन सीन करणारे खरे स्टार दिसत आहेत.

ज्यांनी पठाण चित्रपटात शाहरुख आणि दीपिकाऐवजी स्टंट केले आहेत. दोन्ही स्टार्स आपापल्या बॉडी डबल्ससह पोज देताना दिसत आहेत.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण बॉडी डबल्ससह ग्रीन स्क्रीनसमोर उभे असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. चौघांनी सारखे कपडे घातले आहेत. फोटो पाहता, एरिअल सीन दरम्यानचा हा फोटो आहे, ज्यामध्ये दीपिका आणि शाहरुख विमानाला लटकून एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर जाताना दिसत आहेत.

चित्रपटातील ॲक्शन सीनने चाहत्यांचं प्रचंड मनोरंजन केले आहे. शिवाय चित्रपटातील ॲक्शन सीनची चर्चा देखील तुफान रंगली.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा चित्रपट पठाण 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये जॉन अब्राहमने देखील काम केले होते. या चित्रपटाने जगभरात 1 हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे.

त्याचबरोबर हा पहिला चित्रपट आहे ज्याने देशातील 500 कोटींचा क्लब पार केला आहे. अहवालानुसार, शाहरुख खानचा चित्रपट पठाण 22 मार्च 2023 रोजी ओटीटी प्लेटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम वीडियो वर प्रवाहित होईल.