
Swara Bhaskar: माहेर सोडताना ढसाढसा रडली स्वरा, वडिलांच्या डोळ्यात पाणी, Video व्हायरल
Swara Bhaskar News: रांझणा, तनु वेड्स मनू अशा लोकप्रिय सिनेमांमधून प्रसिद्ध झालेली बॉलीवूडमधली सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. स्वराने काहीच दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड फहाद अहमद सोबत कोर्ट मॅरेज केलं होतं.
कोर्ट मॅरेज केल्यानंतर अभिनेत्रीनं अगदी पारंपरिक हिंदू पद्धतीनं लग्न केलं आहे. स्वराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ स्वरा भास्करच्या पाठवणीचा आहे.
(swara bhaskar emotional vidai video)
स्वरा भास्करच्या पाठवणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत स्वरा अत्यंत भावुक दिसत आहे. स्वराला सदिच्छा संदेश देण्यात येतोय. हे ऐकताना स्वरा अत्यंत भावुक झालीय. याशिवाय स्वराचे बाबा सुद्धा इमोशनल झाले आहेत.
स्वराच्या बाबांनी ट्विटरवर लेकीसाठी भावुक पोस्ट लिहिली आहे. स्वराचे बाबा उदय भास्कर लिहितात.. "खडूस बाबांसाठीही हा खरोखरच भावनिक क्षण आहे...'बिदाई' ' आमच्या प्रिय स्वराची."
काहीच दिवसांपूर्वी स्वराने तिच्या निकटवर्तीयांसाठी हा खास रिसेप्शन आयोजित केलं होतं. या रिसेप्शनला काँग्रेस प्रमुख राहुल गांधी उपस्थित होते. राहुल गांधी यांचा एक विडिओ विरल भयानीने व्हायरल केलाय.
या व्हिडिओत राहुल गांधी यांची स्वरा भास्करच्या वेडिंग रिसेप्शनला ग्रँड एंट्री झाली. राहुल गांधी त्यांच्या नेहमीच्या पांढऱ्या सदऱ्यात रिसेप्शनला उपस्थित होते.
रिसेप्शनमध्ये राहुल गांधी यांचा खेळकर स्वभाव दिसून आला. उपस्थित पाहुण्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. आणि हसत खेळत रिसेप्शनमध्ये त्यांचा खास अंदाज दाखवला. दिल्लीतील एअर फोर्स सभागृहात स्वराचा शाही रिसेप्शन सोहळा पार पडला.
स्वराचे राहुल गांधी यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत स्वरा त्यांच्यासोबत सहभागी होती.
त्याआधी स्वरा भास्करचा प्री-वेडिंग सोहळा १२ मार्च रोजी पार पडला,ज्यात हळदी समांरभ आणि मेहेंदी काढण्याचे कार्यक्रम सामिल होते.
दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा होता..याशिवाय तिच्या लग्नाची सप्तपदी देखील पार पडली आहे.पुढे १५ मार्च रोजी एक श्रवणीय कव्वाली समारंभ संपन्न झाला. त्या समांरभात देखील जवळचे कुटुंबिय आणि मित्रपरिवार सामिल होईल.